
निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समरसता साहित्य परिषद , पिंपरी चिंचवड शाखा, संस्कार भारती पिंपरी चिंचवड आयोजित “साहित्यिक संवाद” हा साहित्यिक उपक्रम स्व. दत्तोपंत म्हसकर सभागृह ,निगडी – प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण हे होते. समरसता साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या अध्यक्ष मानसी चिटणीस यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच समरसता गीत अन् सुभाष चव्हाण यांनी केलेल्या मधुर शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
आर्चिस केळकर, सुनिता कुलकर्णी, उज्वला केळकर यांनी अहिल्याबाई होळकर, स्वामी विवेकानंद, डॉ. हेडगेवार यांच्या चरित्रातील उताऱ्यांचे अभिवाचन केले.
याप्रसंगी डॉ. गिरीश आफळे, रविकांत कळमकर, प्रा. तुकाराम पाटील,शोभा जोशी, राजन लाखे, राज अहेरराव, राजेंद्र घावटे, सुरेश कंक,संदीप तापकीर,रमेश वाकनीस ,विजय शेंडगे, पंजाबराव मोंढे, ह. भ. प.अशोकमहाराज गोरे, नंदकुमार मुरडे, सविता इंगळे,प्रदिप तळेकर, राजेंद्र देशपांडे, नीलिमा फाटक, राधाबाई वाघमारे, माधुरी विधाटे, कैलास भैरट,आनंदराव मुळुक, सुलभा सत्तुरवार,अश्विनी रानडे, वैशाली मोहिते, शरद काणेकर, रजनी अहेरराव, राजेश चौधरी, मीनाताई पोकरणा,इत्यादी मान्यवर, जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य व परिसरातील साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहित्यिक संवाद साधताना योगेश सोमण यांनी – “खऱ्या अर्थाने समाज माणसाला साहित्य शिकवतो. दुसऱ्या माणसांवर टीका करण्यापेक्षा आपण आपले उत्तम काम सुरू ठेवावे. साहित्यिक समाज घडवीत नसतो तर समाजच साहित्य घडविते. लेखक हा स्वतःचा पहिला वाचक असतो. लेखकाने सहजतेने लिहित रहावे त्यातून उपदेश न देता परिणाम साधता आला पाहिजे. साहित्य लिहीत असताना कल्पनाविलास नसावा तर जीवनानुभव असावा. मनात साठलेले चांगले अनुभव कृतीत आणणे ही असते समरसता. साहित्यिक नव्याने काही शिकत असतात. साहित्यिकांनी एकाच चौकटीत लेखन करू नये. शाश्वत फक्त सकारात्मकता असते; त्या दृष्टीने साहित्यिकांची वाटचाल असली पाहिजे. तरुणाई पुस्तक वाचत नाही हा समज आहे तेही वाचतात. तरुणाई काय वाचते याचा साहित्यिकांनी विचार केला पाहिजे. साहित्य विकसित होण्यासाठी माणसांनी एकत्र आले पाहिजे.”असे बहुमूल्य विचार व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड शहर कार्यवाह नरेंद्र पेंडसे यांनी पर्यावरण संवर्धन, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वबोध, नागरी कर्तव्य या पंच परिवर्तनावर विचार व्यक्त केले. आपण आपला देश नव्या पिढीला आवडेल , अभिमान वाटेल असा घडवू या! ”
हा बहुमोल संदेश दिला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य वाढवणार कां?
दूरदर्शनवर अनेक वाईट गोष्टींचा भडीमार होत आहे तो थांबवता येईल कां?
विद्रोह टोकदार झाला आहे . नकारात्मकते कडे चालला आहे
लोहगड घटना.. व्यक्त होऊन थांबायचं कां?
मसाप शाखा वाढीचा विचार आहे का?
असे प्रश्न नारायण देशपांडे, नितीन हिरवे, नीलिमा फाटक या साहित्यिकांनी विचारले यावर योगेश सोमण यांनी समर्पक उत्तरे दिली.
प्रास्ताविक समरसता साहित्य परिषदेच्या अध्यक्ष मानसी चिटणीस यांनी केले.
सूत्रसंचालन स्नेहा पाठक यांनी केले तर आभार सुहास घुमरे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन राऊत, नारायण देशपांडे, हेमंत जोशी, जयश्री श्रीखंडे , निलेश शेंबेकर, सुप्रिया लिमये, सुरेश जोशी, श्रद्धा चटप, निलेश देशमुख यांनी परिश्रम घेतले. प्रज्ञा फुलपगार यांनी गायलेल्या
वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.



