
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बांधकाम कामगाराना सेवा हमी कायद्यानुसार त्वरित लाभ द्या, कामगारां सुरक्षा पडताळणी,कामगारांची पडताळणी संख्या वाढवा, कामगारांना सुरक्षा साधने त्वरित द्या या व अशा विविध मागण्यांसाठी आज कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य तर्फे कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वामध्ये कामगार उपायुक्त कार्यालय पुणे येथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, मनपा समिती सदस्य सलीम डांगे,सखाराम केदार,लाला राठोड, सुनील भोसले,माधुरी जलमूलवार, अर्चना कांबळे,माया शेटे, शामसुद्दीन शेख, कार्तिक सुतार, अरुणा जाधव,संगिता कांबळे,कविता तुपे, शबनम शेख ,गवळण शेवाळे, वनिता बनसोडे, वर्षा जाधव, बिभीषण फड,सुनील वायकुळे,करण पाखरे,केशव टेमुंकरे आदिसह कामगार आदी उपस्थित होते.
मुख्य चौकापासून ते शक्ती चेंबर पर्यंत विविध घोषणा देत पायी मोर्चा कामगार उपायुक्त कार्यालयापर्यंत पोहोचला.
यावेळी नखाते म्हणाले की बांधकाम कामगारां ची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असून कामगारांच्या सुरक्षिततेकडे कामगार आयुक्त कार्यालयाचे पूर्णतः दुर्लक्ष झालेले असून बांधकाम साइट वरती कामगारांना सुरक्षा साधने न देताच कामाला लावले जात आहे यातून अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे अशा आस्थापनावर त्वरित कारवाई करावी. कामगारांची दररोज पडताळणी संख्या १५० करावी . बांधकाम कामगारांसाठी कामगार मंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे सेवा हमी कायद्यानुसार लाभ एका महिन्यात त्वरित देण्यात यावेत. बांधकाम कामगारांची सुरक्षा व अत्यावश्यक साधनांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वाटप केले जाते त्याचबरोबर त्यांना ते साहित्य देण्यास जाणीवपूर्वक दोन ते तीन महिने लावले जात आहेत अशा ठेकेदारावर कारवाई करावी व बोगस साहित्य व दिरंगाई करून वाटप करणाऱ्या ठेकेदारावर सुद्धा कारवाई करावी . हजारो कामगारांनी केलेले अर्ज प्रलंबित आहेत त्यांनी अर्ज केल्यानंतरही अनेक वेळा त्यांना कार्यालयात चकरा मारावे लागत आहेत, त्यांचे अर्ज निकाली काढण्यात येत नाहीत जाणीवपूर्वक वेळ लावली जाते आहे. यासाठी कालबद्ध वेळेत हे अर्ज निकाली निघणे गरजेचे आहे अन्यथा पुढील कालावधीमध्ये बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही नखाते यांनी दिला आहे.
कामगार कल्याण अधिकारी एस आर धोत्रे यांनी यांच्याशी यांना निवेदन देऊन शिष्टमंडळाने चर्चा केली असता याबाबत लवकरच बैठक घेऊन मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.



