
चैतन्य दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात
आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केरळ आणि तामिळनाडूचे प्रभारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास सदिच्छा भेट देत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे अधिकमास मध्ये दर्शन घेतले.
या वेळी त्यांनी श्रींची पूजा करून माऊलींच्या चरणी दर्शन घेत नतमस्तक झाले. श्रींचा कृपाशीर्वाद त्याची या भेटी मध्ये घेतले.
या वेळी पुणे प्रमुख जिल्हा व पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश अरविंद पी. वानखेडे यांचेसह आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, चैतन्य महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. रोहिणी पवार यांच्या हस्ते राज्यपाल आर्लेकर यांचा श्री ज्ञानेश्वरी, पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात झाला.
या प्रसंगी आळंदीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, व्यवस्थापक माऊली वीर, माजी विश्वस्त डॉ. अभय टिळक, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, नगरसेवक आदित्य घुंडरे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, संत सोपानकाका संस्थान सासवडचे त्रिगुण महाराज गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.



