उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपुजन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वराज्य संस्थांनी नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि कलाक्षेत्रातही भरीव योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विविध विकासप्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण, भूमिपुजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमांच्या अनुषंगाने सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम मैदान (पी. डब्लू. डी. मैदान) येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या उद्घाटन समारंभास आमदार आण्णा बनसोडे, उमा खापरे, अश्विनी जगताप, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसदस्य बाळासाहेब लांडगे, जगदीश शेट्टी, अजित गव्हाणे, नाना काटे, संदीप चिंचवडे, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, शाम लांडे, राजू मिसाळ, अमित गावडे, मोरेश्वर भोंडवे, राजेंद्र जगताप, कैलास बारणे, सतीश दरेकर, संजय वाबळे, पंकज भालेकर, मयुर कलाटे, शांताराम भालेकर, विनायक रनसुबे, डब्बू आसवाणी, माजी नगरसदस्या सीमा साळवे, शर्मिला बाबर, सुषमा तनपुरे, आशा शेडगे, स्वाती कलाटे, माया बारणे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, पोलीस उपआयुक्त वसंत परदेशी, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य अभियंता रामदास तांबे, श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे, उपआयुक्त मिनीनाथ दंडवते, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, अमित पंडित, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड या औद्यगिक नगरीची लोकसंख्या लक्षात घेऊन शहराच्या सर्वांगिण विकासासाठी अधिकच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल. नागरिकांचे जीवनमान उंचवावे यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना तसेच उपक्रम राबविले जात आहेत. त्यादृष्टीने विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले असून शहराच्या विकासासोबत रोजगाराच्या संधीदेखील वाढत आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधा लक्षात घेता त्यासाठी सक्षम आणि अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा उभारण्यासाठी ३५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासोबतच पिंपरी चिंचवड शहराची २०३२ पर्यंतची लोकसंख्या लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन शासनाकडून करण्यात येणार आहे, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
कोंडी कमी व्हावी यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी पुणे नाशिक महामार्ग, जुना मुंबई पुणे रस्ता, पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग या रस्त्यांना जोडणारा ९० मीटर स्पाईन रस्ता व ४५ मीटर रुंद डी. पी. रस्ता बनविण्यात आला आहे. भक्ती शक्ती चौक ते मुकाई चौक- किवळे या ४५ मीटर रस्त्यावर निसर्गदर्शन सोसायटीजवळ रेल्वे लाईनवर सुमारे ८५ कोटी ८३ लाख रुपये खर्च करून उड्डाणपुल उभारण्यात आला आहे. या पुलाचा लोकार्पण सोहळा देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.