आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभावे या करिता शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने साई मंदिर आळंदी रोड येथे महाआरती करण्यात आली. व 60 किलो प्रसाद वाटप करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना उपनेते इरफान भाई सय्यद, जिल्हाप्रमुख भगवान शेठ पोखरकर, उपजिल्हाप्रमुख संभाजी शिरसाट, भोसरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय भालेराव मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष जिल्हाप्रमुख सुनील पवार युवा सेना उपजिल्हा प्रमुख अरुण जोगदंड दत्ता आवराळे विधानसभा संघटक संदीप जाधव सोमनाथ महाजन इ शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते

















