पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक महिला दिन (८ मार्च) तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ९ मार्च रोजी होणाऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत मनसेच्या वतीने पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत रुग्णालयातील रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना मनसे कार्यकर्त्यांकडून फळांचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, कार्यकर्त्यांनी विविध विभागांमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली आणि त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. याचबरोबर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांसोबत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ केक कापून त्यांना अल्पोपहार देण्यात आला. या प्रसंगी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहराध्यक्ष बाळा दानवले, रुपेश पाटेकर, नारायण पठारे, विक्रम भोसले, आकाश सगरे, मयूर चिंचवडे, निलेश सूर्यवंशी, परमेश्वर चिल्लरघे, विकी, स्वप्निल महांगरे, नाता शिंदे, सागर बहुले यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गरजू रुग्णांना दिलासा देत आणि महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करत मनसेने सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम राबविल्याने उपस्थितांकडून त्याचे स्वागत करण्यात आले.
सचिन चिखले – मनसे शहर अध्यक्ष

