पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिल्ली येथे आयोजित प्रतिष्ठित ‘ग्लोबल AI समिट’मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी घुसखोरी करून गोंधळ घातल्याच्या निषेधार्थ, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने राहुल गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.
दिल्लीमध्ये भारत अभिमानाने प्रतिष्ठित ‘ग्लोबल AI समिट’चे आयोजन करत आहे. जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे नेते आणि इनोव्हेटर्स भारतात आले असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी समिटच्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार भारत सरकारची बदनामी करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची प्रतिमा खराब करण्यासाठीच केल्याचा आरोप भाजपा युवा मोर्चाने केला आहे.
या प्रसंगी बोलताना पदाधिकारी म्हणाले की, “AI आणि नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची जगभर ओळख वाढत असताना, अशा प्रकारचे वर्तन चुकीचा संदेश देते. राजकारण करायचे असेल तर ते देशाच्या प्रतिमेच्या किंमतीवर नसावे. तरुण पिढी स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताला पुढे नेत असताना त्यांच्यासमोर असा गोंधळ आणि घुसखोरीचे उदाहरण ठेवणे चुकीचे आहे. काँग्रेसने हे समजून घ्यावे की अशा गोंधळामुळे त्यांची सडकी मानसिकता तरुणाईसमोर उघड होत आहे.”
या निषेध आंदोलनात भाजपा शहर संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव, युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे, शहर सरचिटणीस उदय गायकवाड, शहर सरचिटणीस राहुल खाडे, शहर सरचिटणीस प्रसाद कस्पटे, शहर सरचिटणीस सुमित घाटे, दिनेश काटे, सम्यक साबळे, साची दोशी, उपाध्यक्ष देवयानी भिंगारकर, अतुल बोराटे, मयूर काळभोर, उमेश सांडभोर, सागर घोरपडे, आदम मुलानी, अभिजीत बागुल, मनोज घोडेकर, विशाल वाघेरे, राजेश चौधरी, रवी भिलारे, दीपक शिंदे, साईराज भालेकर, सुशांत पवार, अमीर शेख, गौरव शिरुडे, आशिष राऊत, निखिल शहाणे, जयदीप करपे, शैलेश स्वामी, विजय पवार, ओमकार पवार, प्रतीक भालेराव, अथर्व देवके, आकाश वाळके, रवी पारखे, ऋषिकेश भालेकर, अतुल काळोखे, अजय साने, साईराज भालेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

