ताज्या घडामोडीपिंपरी

शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आमदार शंकर जगताप

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल

Spread the love

 

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरासाठी भाजपच्या वतीने महापौरपदासाठी रवी लांडगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महापौर म्हणून रवी लांडगे यांच्या माध्यमातून महापालिकेच्या सभागृहातून शहरासाठी सर्वंकष विकासाचे निर्णय होतील आणि शहराच्या प्रगतीची घोडदौड कायम राखली जाईल असा विश्वास निवडणूक प्रचार प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी सोमवारी व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर पदासाठी रवी लांडगे आणि उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, ज्येष्ठ नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेविका नम्रता लोंढे, ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेवक अभिषेक बारणे, माजी उपमहापौर केशव घोळवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याबाबत आमदार शंकर जगताप म्हणाले,
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला शहरातून घवघवीत यश मिळाले. नागरिकांनी भाजपवर एक हाती विश्वास सोपवला आहे. हा विश्वास पूर्ण करण्याची जबाबदारी आता प्रत्येक नगरसेवकाची आहे. “जबाबदार पालक” या नात्याने प्रत्येक नगरसेवक आता काम करणार आहे. भाजपचे शिस्त, संघटन आणि साधनसुचिता या सर्व गोष्टींचे पालन करण्यासाठी महापालिकेचे सभागृह हे अंतिम असेल. या सभागृहातून शहराच्या विकासाला दिशा देण्याचे काम आगामी काळात महापौर म्हणून रवी लांडगे करतील असा विश्वास असल्याचे आमदार जगताप म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार नगरसेवक रवि बाबासाहेब लांडगे यांनी पक्षाच्या वतीने ‘‘महापौर’’पदासाठी अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौर पदासाठी शर्मिलाताई बाबर यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पाणी व्यवस्थापन आणि सेवा क्षेत्राच्या बाबतीत सर्वंकष विकास केला जात आहे. विकासाची ही घोडदौड कायम राखण्यासाठी महापालिका सभागृह हे अंतिम असणार आहे. सभागृहातील निर्णय नागरिकांच्या सेवेसाठी आणि सुविधेसाठी घेतले जातील. हा विश्वास महापौर या नात्याने रवी लांडगे आणि, उपमहापौर म्हणून शर्मिला बाबर ठामपणे सार्थ ठरवतील.

शंकर जगताप
आमदार, पिंपरी चिंचवड शहर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button