Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पिंपरी-चिंचवडमध्ये सूर्यनमस्कार महोत्सव उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवडमध्ये सूर्यनमस्कार महोत्सव उत्साहात संपन्न

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com26 January 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आशा किरण सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा जागतिक सूर्यनमस्कार महोत्सव मोरया गोसावी क्रीडांगण, केशवनगर, चिंचवडगाव येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

या महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी एकत्र येत सूर्यनमस्कार सादर करून योग व उत्तम आरोग्याचा संदेश दिला.

या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच प्राचीन भारतीय योगपरंपरेचा जागर करण्यात आला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी महापौर अर्पणा डोके, नगरसदस्य सुरेश भोईर, अनंत कोऱ्हाळे, उप आयुक्त पंकज पाटील,ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.

योगशिक्षक निर्मल गुप्ता, आशा किरण फाऊंडेशनचे अध्यक्ष रामकृष्ण पालमकर, वर्षा पवार, अविनाश गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सूर्यनमस्कार सादर करून शिस्त, समन्वय आणि एकतेचे दर्शन घडविले.

सूर्यनमस्कार हा शरीरसामर्थ्य, लवचिकता, श्वसनशुद्धी आणि मानसिक स्थैर्य वाढविण्यास उपयुक्त असल्याचे मत यावेळी उप आयुक्त पंकज पाटील यांनी व्यक्त केले.

तर नियमित सूर्यनमस्कार केल्यास तणावमुक्त जीवनशैली सहज साध्य होऊ शकते असे उप आयुक्त ममता शिंदे म्हणाल्या.

या कार्यक्रमात विविध मनपा माध्यमिक विद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला. त्यामध्ये वाकड, उद्यमनगर, काळभोरनगर, केशवनगर, पिंपळे गुरव, संत तुकारामनगर, फुगेवाडी, पिंपळे सौदागर, थेरगाव, खराळवाडी, नेहरूनगर, रुपीनगर, श्रमिकनगर (निगडी), पिंपरी नगर, कासारवाडी, लांडेवाडी, किवळे, चिंचवड, चऱ्होली, पिंपळे निलख तसेच उर्दू माध्यमिक विद्यालय व त्यांच्या भाग शाळांचा सहभाग होता.

क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे, क्रीडा पर्यवेक्षक अरुण कडूस तसेच विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकही यावेळी उपस्थित होते.

यावेळी संपूर्ण क्रीडांगणात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साही वातावरण अनुभवायला मिळाले यावेळी स्थानिक नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

सूर्यनमस्कार महोत्सव हा पिंपरी चिंचवड शहरासाठी आरोग्य, योग आणि सामाजिक एकात्मतेचा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्याबाबतही जागरूकता निर्माण झाली आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व घटकांनी एकत्र येत एकाच वेळी सूर्यनमस्कार सादर करणे हे शहरातील सामाजिक सलोखा आणि शिस्तीचे उत्तम उदाहरण आहे. अशा उपक्रमांमुळे निरोगी, सशक्त आणि सकारात्मक समाज घडविण्यास निश्चितच चालना मिळेल.

— पंकज पाटील,
उप आयुक्त,
पिंपरी चिंचवड महापालिका

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक अभ्यासासोबतच योग व शारीरिक स्वास्थ्य अत्यंत महत्त्वाचे आहे. सूर्यनमस्कारासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकाग्रता आणि सकारात्मक जीवनदृष्टी विकसित होते. अशा उपक्रमांमुळे निरोगी व सुसंस्कारित पिढी घडण्यास निश्चितच मदत होईल.

— ममता शिंदे
उप आयुक्त,
पिंपरी चिंचवड महापालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Next Article पीएमआरडीए मुख्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.