Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»भाजपचा बहुमताचा ‘महाविजय’; राष्ट्रवादीला पुन्हा विरोधकांची भूमिका
ताज्या घडामोडी

भाजपचा बहुमताचा ‘महाविजय’; राष्ट्रवादीला पुन्हा विरोधकांची भूमिका

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com17 January 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Oplus_131072
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत 128 पैकी भारतीय जनता पक्षाचे तब्बल 85 उमेदवार विजयी झाले. भाजपाने सलग दुसर्‍यांदा महापालिकेची सत्ता काबीज केली आहे. तर, फेब्रुवारी 2017 ला हातातून निसटलेली सत्ता ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप करत शहर पिंजून काढले. मात्र, पिंपरी-चिंचवड शहराने राष्ट्रवादीला पुन्हा नाकारले. एकूण 36 जागा राखलेल्या राष्ट्रवादीला सलग दुसर्‍यांदा विरोधी बाकावर बसण्याची नामुष्की आली आहे.

तब्बल नऊ वर्षांनंतर महापालिकेची यंदा निवडणूक झाली. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार्‍या भाजपाने 77 नगरसेवकांवरून 85 वर झेप घेतली आहे. तर, निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी शहरात तळ ठोकला. भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे वेगवेगळे आरोप करीत त्यांनी रान पेटवले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या वेळेइतकेच केवळ 36 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

अखेरच्या टप्प्यात भाजपासोबत फिसकटलेल्या युतीमुळे अडचणीत सापडलेले खासदार श्रीरंग बारणे हे नेतृत्व करीत असलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला केवळ 6 जागा प्राप्त करता आल्या. त्यात एक त्यांचा मुलगा व एक त्यांचा पुतण्या आहे. गेल्या वेळेस शिवसेनेचे 9 नगरसेवक सभागृहात होते. महापालिकेत भाजपापुरस्कृत एक नगरसेविका विजयी झाल्या आहेत. निवडणुकीत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा मुलगा प्रथमच, तर, भाजपाचे आमदार अमित गोरखे यांच्या आई दुसर्‍यांदा विजयी झाल्या आहेत. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आला नाही.

भाजपाचा आठ जागांचा फायदा
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाचे 77 नगरसेवक होते. यंदा त्यात 8 जागांची भर पडली आहे. तर, एबी फॉर्म भरता न आल्याने अपक्ष ठरलेल्या एक उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे 9 जागा वाढल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या सभा झाल्या. निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, आ. महेश लांडगे, विधान परिषदेच्या आ. उमा खापरे, अमित गोरखे तसेच, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली. अजित पवारांच्या आरोपांना उत्तरे न देता विकासाच्या मुद्द्यावर भर दिला. पक्षाने निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक माजी नगरसेवकांना पक्षात घेत त्यांना थेट उमेदवारी देत कमकुवत प्रभाग सशक्त केले आणि विजय साकारला.

राष्ट्रवादी पुन्हा विरोधी बाकावर
फेब्रुवारी 2017 ची निवडणुकीत विठ्ठलमूर्ती खरेदी घोटाळ्याचा मुद्दा गाजवत भाजपाने पहिल्यांदा महापालिकेची सत्ता काबीज केली. त्यानंतर शहरात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसने उभारी घेतली नाही. निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी शहरात एन्ट्री घेत भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराच्या फैर्‍या झाडत, भाजपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना खिंडीत पकडले. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी त्या आरोपांबाबत तोंड न उघडता, स्थानिक नातेगोते व राजकीय संबंध सांभाळण्यावर भर दिला. शेवटच्या टप्प्यात शहरात येऊन एकट्या अजित पवारांना खांद्यावर निवडणुकीचा भर आला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पक्षाचे अनेक माजी नगरसेवकांनी हातात कमळ घेतल्याने दुसर्‍या फळीतील उमेदवारांना रिंगणात उतरावे लागले. त्याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही.

शिवसेनेची घसरण
महापालिकेच्या मागील निवडणुकीत एकसंघ शिवसेनेचे 9 नगरसेवक होते. यंदा महायुतीत असलेल्या शिवसेनेची (एकनाथ शिंदे) शहरात घसरण झाली आहे. केवळ 6 नगरसेवक विजयी झाले आहे. भाजपासोबत होणारी युती अखेरच्या क्षणी तुटल्याचे पक्षाला अनेक ठिकाणी उमेदवार देता आले नाही.

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपळे सौदागरमध्ये कमळ फुलले; भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा दणदणीत विजय
Next Article पिंपरी-चिंचवडमध्ये बदलाची लाट; ६४ नवे चेहरे सभागृहात, भाजप सर्वाधिक ‘फ्रेश’ नगरसेवकांसह आघाडीवर
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.