Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज
ताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com14 January 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  गुरूवार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणारी मतदान प्रक्रिया मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यंत्रणा सज्ज असून मतदारांनी आपला संविधानिक हक्क बजावण्यासाठी उत्स्फुर्तपणे मतदान करून इतर पात्र मतदारांना मताधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

महापालिका क्षेत्रातील एकूण मतदार संख्या १७ लाख १३ हजार ८९१ इतकी असून यामध्ये ९ लाख ५ हजार ७२८ पुरुष, ८ लाख ७ हजार ९६६ स्त्रिया आणि १९७ इतर मतदारांचा समावेश आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, प्रभाग क्रमांक १६ हा ७५ हजार १०५ मतदारांसह सर्वाधिक मतदारांचा प्रभाग ठरला आहे, तर प्रभाग क्रमांक २३ मध्ये सर्वात कमी म्हणजे ३३ हजार ३३ मतदार आहेत. मतदारांच्या सोयीसाठी एकूण २ हजार ६७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

यामध्ये काही तात्पुरत्या स्वरूपात मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय त्याची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक १ अंतर्गत ५२, कार्यालय क्रमांक २ अंतर्गत ५४, कार्यालय क्रमांक ३ अंतर्गत ३, कार्यालय क्रमांक ४ अंतर्गत सर्वाधिक १०८, कार्यालय क्रमांक ५ अंतर्गत २७, कार्यालय क्रमांक ६ अंतर्गत २२, कार्यालय क्रमांक ७ अंतर्गत २३ तसेच कार्यालय क्रमांक ८ अंतर्गत ३३ तात्पुरती मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. अशा प्रकारे महापालिका कार्यक्षेत्रात एकूण ३२२ तात्पुरत्या मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

मतदान केंद्रावर विविध सुविधा-
प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा देण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पिण्याचे पाणी, व्हिलचेअर व्यवस्था, प्रतिक्षा कक्ष तसेच प्रथमोपचार पेटीसह इतर सुविधा देण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती सचिन पवार यांनी दिली.

कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सज्ज-
भयमुक्त व निकोप वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार शिवाय विविध पथकांद्वारे देखील पोलीस यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहे. पोलीस बंदोबस्तासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असून त्याद्वारे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मतदान केंद्र तसेच इतर ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दक्षता घेण्यात आली आहे.

कंट्रोल रुमद्वारे लक्ष ठेवणार-
मतदानाच्या दिवशी संपुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व मतदान केंद्रे वेब कास्टिंगद्वारे जोडण्यात आली आहेत. तसेच संपुर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून तात्काळ समन्वय करण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून समन्वयासाठी समन्वय अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल नेण्यास मनाई….
मतदाराला त्याचे मतदान केंद्र, मतदार यादीतील आणि इतर आवश्यक माहिती देण्यासाठी स्लिपा महत्वाच्या आहेत. बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या सहाय्याने घरोघरी जाऊन या स्लिपांचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय स्लिप वाटर करताना मतदान केद्रांमध्ये मोबाईल घेऊन जाण्यास मनाई असल्याबाबत मतदारांना माहिती देण्यात आली आहे. याशिवाय, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय सर्व मतदान केंद्रावर स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्राबाहेर मतदारांचे मोबाईल ठेवण्यासाठी मैथिली व आंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

*१६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून पार पडणार मतमोजणी-*
मतमोजणी निश्चित केलेल्या ठिकाणी शुक्रवार दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. ई. व्ही. एम फेरीसाठी स्वतंत्र टेबल असणार आहेत. तसेच टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीचा प्रत्येक फेरीनिहाय निकाल जाहिर करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय नियोजन करण्यात आले असून सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावर स्वतंत्र मिडीया सेलची व्यवस्था करण्यात येणार आहे.

दरम्यान, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी महापालिका कार्यक्षेत्रातील ८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय उभारण्यात आलेल्या मतदान साहित्य वाटप केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या मतदान साहित्य वाटप प्रक्रियेचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची तपासणी करताना साहित्य वितरण वेळेत, सुयोग्य व शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे का, याची खात्री त्यांनी करून घेतली.

या पाहणी दरम्यान उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया डांगे, अर्चना तांबे, डॉ. दिप्ती सूर्यवंशी, अर्चना पठारे, हिम्मत खराडे,अनिल पवार, नितीन गवळी, पल्लवी घाटगे, निवडणूक विभागाचे उप आयुक्त सचिन पवार, उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे तसेच ८ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह विविध कक्षांचे प्रमुख उपस्थित होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article१२ जिल्हा परिषदांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान; ७ फेब्रुवारीला मतमोजणी
Next Article पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान साहित्य सुरक्षितपणे मतदान केंद्रांवर पोहोच
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.