Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»लोकशाहीत दादागिरी सहन करणार नाही; भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे सादर करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
ताज्या घडामोडी

लोकशाहीत दादागिरी सहन करणार नाही; भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे सादर करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com2 January 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Oplus_131072
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमच्यावरही बिनबुडाचे आरोप झाले होते. कोणावर आरोप झाला म्हणजे तो गुन्हेगार ठरत नाही. माझ्यावर सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता; पण ज्यांनी आरोप केले, त्यांच्याच सोबत आज मी सरकारमध्ये काम करतो आहे. महापालिकेत आम्ही कामाची माणसे आहोत. मात्र, भाजपमध्ये सध्या दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांची टोळी तयार झाली, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. २) येथे केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या नारळ फोडला. त्यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, राष्ट्रवादी (शरद पवार)चे शहराध्यक्ष तुषार कामठे, नाना काटे, अजित गव्हाणे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, आमच्या सत्ताकाळात २०१७ पर्यंत शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. मात्र, ज्यांना मी पदे दिली होती, ते माझे अनेक सहकारी २०१७ नंतर मोदी लाटेमध्ये निघून गेले. एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडला ‘बेस्ट सिटी ऑफ इंडिया’चा पुरस्कार मिळाला होता. त्या काळात आम्ही महापालिकेला कधीही कर्जात टाकले नाही. उलट ठेवी वाढवल्या. मात्र, गेल्या काही वर्षांत जवळपास आठ हजार कोटी रुपयांच्या ठेवी कमी झाल्या आहेत; पण त्या बदल्यात काम तरी कुठे दिसत आहे?

‘रिंग’ करून निविदांची रक्कम फुगवली जाते…

पवार म्हणाले की, आज बनवलेले रस्ते काही दिवसांत उखडतात. अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली कोट्यवधींची कामे काढली जातात. निविदांमध्ये कंत्राटदारांची ‘रिंग’ होते, दर फुगवले जातात. अनेक ठिकाणी २०-२० टक्क्यांचा फरक आहे. दुसरीकडे कमी पैशांत चांगले रस्ते तयार होतात, मग येथे एवढा खर्च का? एक किलोमीटरसाठी परवानगी घेतली जाते आणि चार किलोमीटरपर्यंत खोदाई केली जाते. माती टाकून बुजवली जाते, पुन्हा रस्ता केला जातो. यातून नागरिकांचा पैसा वाया जात आहे. शहरात २० हजार कुत्र्यांची नसबंदी झाली; पण कुत्रे चावण्याच्या १ लाख ७० हजार घटना नोंदवल्या गेल्या. यात मोठा भ्रष्टाचार आहे. पन्नास हजारांच्या टीव्हीसाठी दीड लाख रुपये खर्च केले; पण शाळांमध्ये इंटरनेटच नाही. गरिबांच्या  पोरांचे शिक्षण स्मार्ट होण्याऐवजी पैसा वाया गेला.

पवार म्हणाले की, अर्ज भरलेल्या उमेदवारांचा सिनेस्टाइल पाठलाग करून माघार घ्यायला लावली. काहींना गाडीत बसवून धमकावले. कायदा-सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. लोकशाहीत अशी दादागिरी सहन केली जाणार नाही. मी फक्त टीका करणारा नाही. भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे सादर करणार आहे. मला अजितदादा म्हणतात पण मी दादागिरी करत नाही.

 

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराष्ट्रवादीच्या प्रचारास प्रभाग क्र. १९ मध्ये सुरुवात; उमेदवारांनी घेतल्या घरोघरी गाठीभेटी
Next Article संघटन मजबूत; पक्षावरील विश्वास वाढतोय – आमदार शंकर जगताप 
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.