“एक बार फिर से प्रियांका बारसे” प्रभाग ५ मध्ये राष्ट्रवादीची ताकद दाखल; प्रियांका बारसे यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ (गवळीनगर – सर्वसाधारण महिला) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने आपली ताकद ठामपणे दाखवत प्रियांका बारसे यांचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. घड्याळ या निवडणूक चिन्हावर त्यांनी आज आपला अर्ज सादर केल्यानंतर प्रभागातील राजकीय वातावरण तापले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रीय असलेल्या प्रियांका बारसे यांनी महिलांचे प्रश्न, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य सेवा तसेच मूलभूत नागरी सुविधांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि पारदर्शक प्रशासन हेच आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अर्ज दाखल करण्यापूर्वी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. “एक बार फिर से प्रियांका बारसे” या घोषणांनी गवळीनगर परिसर दणाणून गेला. कार्यकर्ते, महिला भगिनी, युवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला भक्कम पाठिंबा दिला.
अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना प्रियांका बारसे म्हणाल्या,“प्रभाग क्रमांक पाचचा सर्वांगीण विकास, महिलांचे सक्षमीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवणे यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. नागरिकांनी दिलेल्या विश्वासाला न्याय देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.”
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक, अनुभवी कार्यकर्ते आणि विविध सामाजिक घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एकजूट, संघटनशक्ती आणि लोकसमर्थनाचे प्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक ५ मध्ये निवडणूक रणधुमाळीची जोरदार सुरुवात केल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.




















