कै. राम गणेश गडकरी स्मृती, कोहिनूर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी 2 ते 4 फेब्रुवारीला चिंचवडला होणार
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा गेली २५ वर्षे सातत्याने पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि कोहिनूर ग्रुप यांचे संयुक्त विदयमाने कै. राम गणेश गडकरी यांच्या स्मृती निमित्त राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेचे आयोजन करते. यावेळी कै. राम गणेश गडकरी स्मृती, कोहिनूर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी विविध केंद्रावर घेण्यात आली होती. त्याचा निकाल शुक्रवार दि. २६ जानेवारी सायंकाळी ७ वा. एकत्रित पणे जाहीर करण्यात आला.
या स्पर्धेत एकूण ५५ संघांनी यामध्ये भाग घेतला होता. नाशिक, मुंबई, कोल्हापूर आणि पिंपरी चिंचवड अश्या विविध केंद्रावर हि स्पर्धा पार पडली. या स्पर्धेची अंतिम फेरी हि प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे दिनांक २ ते ४ फेब्रुवारी २०२४ सकाळी १० ते ३ या वेळेत होणार आहे. दि. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वा. निकाल व पारितोषिक वितरण होणार असून, रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले.
अंतिम फेरीत दाखल झालेले संघ
१) श्री. पद्म्तारा सामाजिक बहुउद्देशीय संस्था नाशिक (कोहम)
२) अ.भा.मराठी नाट्य परिषद, नाशिक (अ डील)
३) सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविध्यालय, ठाणे (उणीवांची गोष्ट)
४) कलांश थियेटर, मुंबई (जिन्याखालची खोली)
५) क्रिएटीव कार्टी, मुंबई (इंटरोगेशन)
६) मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविध्य्लाया, पुणे (सिनेमा)
७) ड्रास्टिक क्रिएशन, पुणे (वाटसरू)
८) पसायदान थियेटर चिंचवड (सत्याचे प्रयोग)
९) रेवण एन्टरटेनमेंट कोथरूड, पुणे (हॅलो इन्स्पेक्टर)
१०) कलापिनी तळेगाव दाभाडे (सांगड)
११) परिवर्तन कला फाउंडेशन कोल्हापूर (जंगल जंगल बटा चला है)
१२) गायन समाज देवल क्लब कोल्हापूर (BEING AND NOTHING)