पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील उमेदवार विनोद नढे यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला नवा वेगळा आयाम देत थेट जनसंवादावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रचाराच्या धावपळीतही नियोजन, शिस्त आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी ही रणनीती सध्या प्रभागात चर्चेचा विषय ठरत आहे.
उमेदवारांनी स्वतःच्या हस्ताक्षरात तयार केलेल्या प्रचार नोंदीत आजच्या प्रचार फेरीचा सविस्तर आराखडा स्पष्टपणे मांडण्यात आला आहे.
पवननगर कॉलनीतील १, २, ३ व ४ या भागांमध्ये आज सखोल प्रचार फेरी घेण्यात येणार असून, प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा संकल्प यामध्ये नमूद करण्यात आला आहे. प्रचारादरम्यान फटाके आतषबाजी न करता, प्रत्यक्ष संवाद व मतदारांशी चर्चा यावर भर देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट संकेत आहेत.
या प्रचार फेरीत ‘प्रत्येक वॉर्ड, प्रत्येक घर’ हा मंत्र घेऊन नागरिकांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विशेषतः महापालिकेच्या प्रशासकीय धोरणांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणे, तसेच त्या सोडवण्यासाठी ठोस शब्द देणे, हा या प्रचाराचा मुख्य गाभा आहे.
पवननगर कॉलनी परिसरातील सर्वे नंबर ९३ मधील नागरिक हे मध्यमवर्गीय व सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने, त्यांच्या दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
वाढते कर, नागरी सुविधांचा अभाव, पायाभूत सोयीसुविधांची अपुरी कामे आणि प्रशासकीय दुर्लक्ष यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
ही प्रचार पद्धत म्हणजे केवळ निवडणुकीपुरती औपचारिकता नसून, सत्तेत आल्यानंतरही हाच संवाद कायम ठेवण्याची ग्वाही उमेदवारांनी दिली आहे. “आम्ही फक्त मत मागायला नाही, तर समस्या समजून घेऊन त्या सोडवायला आलो आहोत,” असा स्पष्ट संदेश या प्रचारातून देण्यात येत आहे.
एकूणच, प्रभाग २२ मध्ये भाजप उमेदवार विनोद नढे यांचे नियोजनबद्ध, मुद्देसूद आणि लोकाभिमुख प्रचार विरोधकांसाठी आव्हान ठरत असून, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ही रणनीती किती निर्णायक ठरेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

