–प्रसिध्द अभिनेत्री निशिगंधा वाड, वास्तु सल्लागार आनंद पिंपळकर ,महावीर प्रतिष्ठानचे विजयकांत कोठारी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
कासारवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी पुणे- येथील आचार्य आनंद ऋषीजी इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेला पंचवीस वर्षे पूर्ण होत असून पंचविसावे रौप्य महोत्सवी वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच अतिशय उत्साहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संपन्न झाले .
या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड ,वास्तू सल्लागार आनंद पिंपळकर,सकल जैन संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयकांत जी कोठारी , अस्तित्व कलामंचचे अध्यक्ष योगेश जी गोंधळे , राजकीय स्वीय सहाय्यक प्रतीक जी पवार हे मान्यवर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया होते .तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल कटारिया सचिव नयन भंडारी, खजिनदार महावीर कुवाड, आणि इतर स्कूल कमिटी सदस्य विलासकुमार पगारिया, किरण भंडारी ,कल्पेश पगारिया ,संदीप फुलफगर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुलभा मुंगी ,सौ लता पगारिया,उप मुख्याध्यापिका सुवर्णा शिंदे,कार्यालयीन अधीक्षक शिल्पा लांडे आणि निरीक्षक गोविंद चौधरी तसेच डीएमके स्कूल च्या मोनिका कर्नावट आदि संस्था चालक व मान्यवर मंचावर उपस्थित होते. विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख अतिथी व इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात जे माजी विद्यार्थी डॉक्टर ,इंजिनिअर ,सीए व इतर क्षेत्रांमध्ये उच्च पदस्थ आहेत अशा दहा माजी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला .शाळेमधील गुणवंत विद्यार्थी ,क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थी व इतर स्पर्धा मधील यशस्वी विद्यार्थी यांचाही सन्मान पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी बोलताना निशिगंधा वाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या करिअर विषयी माहिती दिली. आनंद पिंपळकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ अशोककुमार पगारिया सर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये संस्थेची स्थापना झाल्यापासून च्या गेल्या पंचवीस वर्षातील शाळेच्या प्रगतीचा आणि उद्देशांचा अहवाल मांडला.
सर्वसामान्य परिवारातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेता यावे या उद्देशातून पंचवीस वर्षांपूर्वी या शाळेची स्थापना त्यांनी व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी केली व त्यानंतर पंचवीस वर्षात अनेक विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडले .किमान फी मध्ये या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले जाते. शिक्षणाच्या दर्जा विषयी कोणतीही तडजोड केली जात नाही. मात्र गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे हा उद्देश संस्थेने गेली 25 वर्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे .यावेळी मुख्याध्यापिका सुलभा मुंगी यांनी आभार मानले .शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सुंदर रीतीने सादर केले यावेळी पिंपरी चिंचवड मनपाच्या शिक्षण विभागातील अधिकारी जरिता रणखांबे आणि नीता खाडे यांचाही प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.वास्तुतज्ज्ञ आनंद पिंपळकर आणि मनपाच्या शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया व लता पगारिया यांचा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अभिनंदन करून सत्कार केला. या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड मधील अनेक मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते त्यामध्ये ज्ञानेश्वर विधाटे शांताराम जाधव ,जयहिंद दौंडकर, पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया, विजय भिलवडे , अशोक बागमार
सुभाष ललवाणी, पी एम जैन, ,सुभाष सुराणा , नंदकुमार लुणावत ,दिलीप भन्साळी ,प्रा प्रकाश कटारिया, श्रेणिक मंडलेचा ,संदेश गदिया, देवेंद्र पारख , पंकज कांकरिया,अनिता नहार , रमणलाल कर्नावट, वसंतलाल बोरा , सतीश मोदी प्राचार्य सदाशिव कांबळे ,प्रा सचिन पवार , पार्श्वनाथ युवक मंडळ, सुशील बहु मंडळ,चे सदस्य , पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,शेवटी सौ सुलभा मुंगी यांनी आभार मानले .व दर्शना गौरव पारख यांनी सूत्रसंचालन केले.

















