मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रदेश काँग्रेस कार्यालय टिळक भवन या ठिकाणी राज्यातील आगामी महानगरपालिकेच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातील पदाधिकाऱ्यांची राज्य निवड समिती सोबत बैठक आयोजित केली होती.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सर्व प्रदेश व शहर ब्लॉक, फ्रंटल, सेलचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत असताना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी (अजित पवार ) गटासोबत कोणत्याही प्रकारे काँग्रेस जाऊ शकत नाही तेव्हा समविचारी पक्षांशी बोलणे करून काँग्रेस पक्षाने स्थानिक निर्णय घेऊन निवडणुकीला सामोरे जावे.
यावेळी एकमताने सर्व पदाधिकारी यांनी हा निर्णय स्वीकारत पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस आगामी भूमिका स्पष्ट करेल व आता काँग्रेसच्या समविचारी पक्षांशी बोलणी करून लवकरच जागा वाटपाचे सूत्र ठरवून पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस या निवडणुकीला सामोरे जाईल.

