ताज्या घडामोडीपिंपरी

वकील दांपत्याच्या हत्येचा पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने निषेध

Spread the love

 

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकिली क्षेत्रात कार्यरत असलेले ॲड. राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव हे दांपत्य गुरुवारी, दिनांक २५ जानेवारी २०२४ पासून बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात आला असता दांपत्याची हत्या झाल्याबाबत कळाले. सदर वकील दांपत्याचे अपहरण करून हत्या झाली ही अतिशय निंदनीय बाब असल्याने याचा निषेध म्हणून आज पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने पिंपरी न्यायालयातील वकील बार रूममध्ये निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सदर वकील दांपत्याच्या हत्येचा तीव्र शब्दांत सर्व वकील बंधू भगिनींच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. यावेळी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. एस. बी. चांडक, ॲड. सुशील मंचरकर, ॲड. देवराव ढाळे, ॲड. अशोक भटेवरा, ॲड. राजू माधवन, ॲड. किरण पवार, माजी उपाध्यक्ष ॲड. दत्ता झुळूक, ॲड. नवीन वालेचा, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सत्यन नायर, ॲड. सारिका परदेशी, पुणे लॉयर्स सोसायटीचे सचिव ॲड. अतिष लांडगे आदींनी निषेध व्यक्त केला. तर यावेळी ॲड. दिनकर लाळगे, ॲड. अनिल शेजवानी, ॲड. सूर्यकांत काळे, ॲड. अतुल कांबळे, ॲड. मंगेश खराबे, ॲड. कृष्णा वाघमारे, ॲड. मंगेश नढे, ॲड. सोनाली गुंजाळ, ॲड. श्रद्धा मंचरकर, ॲड. राजेश रणपिसे, ॲड. विकास शर्मा, ॲड. शंकर घंगाळे, ॲड. भारत सलगर, ॲड. पूजा बदे, ॲड. शुभम खैरनार, ॲड. बालाजी देशमुख , ॲड. सागर अडागळे, ॲड. प्रकाश निनाळे, ॲड. स्वाती पावडे, ॲड. अजमा मुजावर, ॲड. अमोल सोनगीरे, ॲड. अंजली रणपिसे, ॲड. पूनम शर्मा, ॲड. सचिन पाटील, ॲड. अक्षय रसाळ, ॲड. विजय भगत, ॲड. रामजी रामगुडे, ॲड. रवी अगरवाल, ॲड. शिवम कुंभार आणि इतर वकील बांधव उपस्थित होते.

यावेळी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांनी वकील आढाव दांपत्याच्या झालेल्या हत्येचा निषेध व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पित केली आणि सदर दांपत्याला न्याय मिळवून देण्यासाठी एकदिवसीय कामकाज बंद ठेवण्याचे वकिलांना आवाहन करीत दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी आझाद मैदान येथे वकील संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ऑल इंडिया लॉयर्स फेडरेशन यांच्यावतीने आयोजित आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने पिंपरी – चिंचवड मधील वकील सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वकील संरक्षण कायदा पारित करावा, सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागण्या वकिलांमार्फत
उपस्थित करण्यात आल्यात. सदर निषेध सभेचे आयोजन पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी, सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, सदस्य ॲड.अयाज शेख, ॲड. फारुक शेख, ॲड. अस्मिता पिंगळे आदींनी केले होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button