श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ७५ वा प्रजासत्ताक दिन सोहळा चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रत्येक भारतवासियाला अभिमान वाटावा अशा प्रजासत्ताक दिनी सबंध भारतात जल्लोष केला जातो. या शुभदिनी भारताचे संविधान लिहिले गेले आणि स्वतंत्र भारताची घटना अमलात आली. शैक्षणिक संस्थांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि देशाप्रती आपले प्रेम व्यक्त केले जाते.
चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन सोहळा अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केला गेला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम तथा क्रीडा प्रकारांच्या सादरीकरणातून भारतीय संस्कृतीचे यथार्थ दर्शन तथा भारतवासियांच्या मनातील देशप्रेम अत्यंत हृदयद्रावक पद्धतीने सादर केले गेले. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी सर्व उपस्थितांची मने जिंकली आणि टाळ्यांच्या गडगडाटात सबंध परिसर दुमदुमून गेला.
सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पू.ना.गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेडचे एक्झेक्युटिव्ह डायरेक्टर पराग गाडगीळ, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब अरगडे पाटील, विधितज्ञ् adv श्री मनोज वाडेकर , इस्रोचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अरुण कुमार सिन्हा, माजी शिक्षणाधिकारी श्री. प्रकाश परब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजमाने साहेब धनश्री हॉस्पिटलचे निर्माते तथा प्रमुख डॉ. श्री. पटवर्धन, संस्कार वर्गांच्या गुरुवर्या श्रीमती रिम्पल शहा उद्योजक श्री यशोधन अदमाने कॅप्टन श्री प्रभाष भोसले ,संस्थेचे अध्यक्ष जगदीश दादा जाधव , सचिव संजय भाऊ जाधव, संचालक विजय जाधव सर् आदि मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थिनींनी सुमधुर स्वरात राष्ट्रगीत आणि झेंडागीत सादर करून देशाच्या तिरंग्याचा यथोचित सन्मान केला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व तालबद्ध पद्धतीने ड्रील मार्चिंगच्या माध्यमातून देशाच्या तिरंग्याला तथा उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. यानंतर मान्यवरांचे स्वागत विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागत गीतातून केले. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी नृत्याच्या माध्यमातून गणेश वंदना सादर करून केली. विद्यालयातील बालचमूंनी देशभक्तीपर नृत्य तथा हनुमान गौरव नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर रोप मल्लखांब ची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यानंतर संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचा यथोचित गौरव तथा सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात सादर केला. जिम्नॅस्टिक्स, तथा लाकडी माल्लाखाम्बावारील चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी सर्व उपस्थितांचे लक्ष वेधले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी मोबाईल वापराचे दुष्परिणाम, एकतेचे महत्व सीमेवरील जवानांचे मौलिक कार्यतथा तानाजी मालुसरेंचे शौर्य आपल्या नृत्यांतून सादर करीत आपल्या भावनांचे सुयोग्य प्रकटीकरण केले. शिवरायांच्या मावळ्यांची पारंपारिक जीवनशैली दर्शविणारे लेझीम हे सदर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. टाळ्यांच्या गडगडाटासह उपस्थितांनी लेझीममधून ऐतिहासिक प्रसंग रेखाटणाऱ्या मावळ्यांचे उत्साह वाढविला. विद्यालायाविषयी बोलताना प्रमुख अतिथी पराग गाडगीळ यांनी संस्थापक कै. आण्णासाहेब जाधव यांच्या दूरदृष्टीचे विशेष कौतुक केले. विद्यालयात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची त्यांनी भरभरून प्रशंसा केली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळाराम पाटील, साहेबराव देवरे उप्मुख्याद्यापक किसन अहिरे ,पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव कोअर कमेटी सदस्या सुषमा संधान , मनिषा जाधव ,श्रीमती छाया ओव्हाळ पालक संघाच्या अध्यक्ष हर्षदा दुरगुडे, शिक्षक पालक संघ सदस्य रविंद्र बिरादार, Adv. श्री. गटे, डॉ. बागले, पोलीस दलाचे रविंद्र पवार, सेवानिवृत्त सेनादल अधिकारी किरण भोसले, विद्यालयाच्या संगणक प्रणालीचे तांत्रिक साहाय्यक धीरज भारंबे विद्यालयाचे माजी विद्यार्थी ,सहा विक्रीकर निरीक्षक अश्विनी गीते. व इन्कमटॅक्स अधिकारी ओमकार उकिरडे इ सह विद्यालायचे हजारो पालक ,व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.