ताज्या घडामोडीपिंपरी

प्रभाग १० मोरवाडीमध्ये प्रा. दत्तात्रय भालेराव यांचा  घरोघरी प्रचार; नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मोरवाडी येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रा. दत्तात्रय भालेराव यांनी सुरू केलेल्या घरोघरी प्रचाराला नागरिकांकडून मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत मोरवाडीतील विविध परिसर, वस्ती आणि सोसायट्यांमध्ये भालेराव यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचा लेखाजोखा मांडला.

या प्रचारादरम्यान नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, शिक्षण तसेच युवकांच्या प्रश्नांबाबत आपली मते मांडली. प्रत्येक प्रश्नाची नोंद घेत भालेराव यांनी “निवडणूक ही केवळ मत मागण्यापुरती नसून लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची संधी आहे,” असा विश्वास व्यक्त केला.
प्रा. भालेराव यांच्या साध्या, अभ्यासू आणि संवादात्मक शैलीमुळे अनेक घरांमध्ये त्यांचे जाहीर स्वागत करण्यात आले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक वर्गात त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण दिसून येत आहे.

“शिक्षण, स्वच्छ प्रशासन आणि पारदर्शक कारभार हेच माझे मुख्य अजेंडे आहेत,” असे त्यांनी सांगितले.
या घरोघरी प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशा, घोषणा किंवा गाजावाजा न करता थेट जनतेशी संवाद साधणाऱ्या या प्रचार पद्धतीमुळे मोरवाडी प्रभागात प्रा. दत्तात्रय भालेराव यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत असल्याचे चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button