पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक ११ शरदनगर येथे झालेल्या प्रचार दौऱ्यात नागरिकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे राजकीय वातावरणात उत्साहाचे चित्र पाहायला मिळाले. उमेदवार निशा दिनेश यादव यांच्या प्रचार दौऱ्यावेळी माता-भगिनी, युवा सहकारी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपुलकी, प्रेम आणि विश्वास व्यक्त केला.
या दौऱ्यादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधताना निशा यादव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “शरदनगरमधील नागरिकांनी दिलेले प्रेम आणि आशीर्वाद हेच माझ्या कार्याची खरी प्रेरणा आहे. हा दौरा केवळ राजकीय स्वरूपाचा नसून, तो आपल्या कुटुंबाशी नाते जोडण्याचा एक भावनिक क्षण आहे,” असे त्या म्हणाल्या. नागरिकांच्या अपेक्षा आणि विश्वासाची पूर्ण जाणीव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रचारादरम्यान युवकांनी विकासकामे, रोजगाराच्या संधी आणि पायाभूत सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केले, तर ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते आणि नागरी सुविधांबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. महिलांनी सुरक्षितता, स्वच्छता आणि सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्याची मागणी केली.
आमदार श्री. पै महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग ११ च्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास निशा यादव यांनी दिला. “आपला विश्वास व्यर्थ जाणार नाही. शरदनगरचा प्रत्येक नागरिक सुखी, सुरक्षित आणि समाधानी व्हावा, यासाठी मी रात्रंदिवस प्रामाणिकपणे काम करेन,” असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रचार दौऱ्यामुळे प्रभाग क्रमांक ११ मध्ये निवडणुकीची धग वाढली असून, निशा दिनेश यादव यांना मिळणारा वाढता जनसमर्थन त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

















