ताज्या घडामोडीपिंपरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाआरोग्य सेवा शिबिरास दापोडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,  ५,००० हून अधिक नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ

सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा निरंजन ठोकळ व सनराईस मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने शिबिराचे यशस्वी आयोजन

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दापोडी येथील सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाताई निरंजन ठोकळ व सनराईस मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाआरोग्य सेवा शिबिर शनिवारी (दि. २९ नोव्हेंबर) यशस्वीपणे पार पडले. दापोडी परिसरातील सुमारे ५ हजारांहून अधिक नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवत शिबिराचा लाभ घेतला.

या एकदिवसीय शिबिरात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील २५ हून अधिक नामांकित रुग्णालयांनी सहभाग घेतला होता. या शिबिरात १२० दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य आणि २,६७४ चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच, १६० रुग्णांची डोळ्यांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली. याशिवाय, २३६ रुग्णांची जनरल शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी आणि इतर शस्त्रक्रियांसाठी नोंदणी झाली असून, त्यांना पुढील उपचारांसाठी संबंधित रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे या शिबिरात समर्थ युवा फाउंडेशनच्या कॅन्सर व्हॅनद्वारे सामान्यतः १३,५०० रुपयांच्या खर्चिक चाचण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. यामध्ये ३५० हून अधिक महिलांनी कॅन्सर व्हॅनमध्ये विविध आरोग्य चाचण्या करून घेतल्या.

या शिबिराचे उद्घाटन डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. हनुमंत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख आयोजक सो.दुर्गाताई निरंजन ठोकळ, निरंजन सोपान ठोकळ, सनराइज मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वप्ना सतीश कांबळे, कार्याध्यक्षा सारिका संतोष कांबळे, पूर्वा संतोष कांबळे, माजी नगरसेवक रोहित आप्पा काटे, माजी नगरसेवक राजू बनसोडे, संदीप गायकवाड, नाना काटे , विशाल वाळुंज यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच मंगेश निर्गुणे, प्रभाकर जाधव, सुशांत भंडारी, विकी मारी, योगेश पांडुरंग कांबळे, विनोद मगर, अरविंद गायकवाड, अजय जाधव, अरविंद पंडित, आनंद कांबळे, प्रमोद वाघमारे, कल्पेश कुलते, नजीर मुजावर, अर्जुन भोसले, केतन जोशी, अजय ठोंबरे, संजय लांडगे, संदेश बोर्डे, कैलास क्षीरसागर, शंतनु सतीश कांबळे, हर्षवर्धन संतोष कांबळे आणि कृष्णा सतीश कांबळे यांनीही शिबिरासाठी विशेष मेहनत घेतली.

दापोडीतील या शिबिराने स्थानिक नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या. सामान्यतः महाग असलेल्या चाचण्या आणि उपचार मोफत उपलब्ध करून देण्यामुळे समाजातील गरजू घटकांना मोठा दिलासा मिळाला. या शिबिरामुळे आरोग्यसेवा सर्वसामान्यांसाठी सुलभ करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. शिबिराच्या यशाबद्दल आयोजक दुर्गाताई ठोकळ यांनी सर्व सहभागी रुग्णालये, कार्यकर्ते आणि दापोडीतील नागरिकांचे आभार मानले. या शिबिरामुळे स्थानिक पातळीवर आरोग्यसेवेचा प्रसार होऊन गरजू रुग्णांना वेळीच उपचार मिळण्यास चांगली मदत होईल, असे मत त्यांनी यावेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button