Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रगत कचरा व्यवस्थापनाची कोयंबतूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून प्रशंसा!
ताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रगत कचरा व्यवस्थापनाची कोयंबतूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून प्रशंसा!

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com24 November 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरी स्थानिक संस्था (युएलबी) यांची कार्यक्षमता वाढविणे, संस्थात्मक शिक्षणाला चालना देणे आणि अत्याधुनिक प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनिक अनुभव समृद्ध करण्याच्या उद्देशाने नुकतेच पिंपरी चिंचवड महापालिकेला कोयंबतूर महापालिकेच्या प्रतिनिधींनी भेट दिली. या भेटीद्वारे अधिकाऱ्यांनी वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन आणि स्वच्छता व्यवस्थापनातील ‘ऑपरेशन अँड मेंटेनन्स’ कामकाजाचे व्यापक निरीक्षण केले.

कोयंबतूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अनामिका रमेश (भा.प्र.से.), मुख्य अभियंता थिरू विजयकुमार यांच्यासह सदर अभ्यासदौऱ्यात कोयंबतूर महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. या भेटीदरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अत्याधुनिक वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या स्थळावर पाहणी करण्यात आली. या प्रकल्पात कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती, संकलन ते विल्हेवाट प्रक्रियेतील यंत्रणा, तसेच पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, याचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेचे कनिष्ठ अभियंता दशरथ वाघोले तसेच वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प सल्लागार प्रतिनिधी स्वरूप लागारे यांनी सदर प्रकल्पाबाबत कोयंबतूर महापालिकेच्या प्रतिनिधींना माहिती दिली.

वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाचे केलेले व्यवस्थापन, स्वच्छता आणि तांत्रिक अंमलबजावणी पाहून विशेषतः कोयंबतूर महापालिकेच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. प्रकल्पातील प्रत्येक प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध व व्यवस्थितपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. उपस्थित अधिकाऱ्यांनी दिलेले सविस्तर मार्गदर्शन, तांत्रिक माहितीची स्पष्ट मांडणी आणि संपूर्ण प्रकल्पाबाबत दाखवलेली पारदर्शकता यांचेही त्यांनी कौतुक केले. या भेटीमुळे महापालिकेच्या कार्यक्षमता, समन्वय आणि प्रगत शहरी व्यवस्थापनाचा उत्कृष्ट अनुभव मिळाल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. पाहणीदरम्यान प्रशासकीय आणि तांत्रिक अनुभवांची देवाणघेवाण करण्यात आली. तसेच दोन्ही महापालिकांदरम्यान भविष्यातील सहकार्याच्या नव्या मार्गांना यामुळे चालना मिळाली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत राबविण्यात येणारे कचरा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक उपक्रम आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प हे शाश्वत शहरी विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहेत. कोयंबतूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली समाधानकारक प्रतिक्रिया आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. अशा देवाणघेवाणीमुळे तांत्रिक प्रगतीला गती मिळते आणि उत्तम प्रशासनासाठी नव्या संधी निर्माण होतात.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

पिंपरी चिंचवड महापालिका शहरातील कचरा व्यवस्थापनाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून हाताळत आहे. वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पामुळे शहरातील कचरा विल्हेवाटीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असून स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना मिळत आहे. आजच्या पाहणीमुळे आमच्या कामाची दिशा इतर महापालिकांसाठी आदर्श ठरत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसार्वजनिक स्वच्छतेत नियमभंग करणांवर महापालिकेची कडक दंडात्मक कारवाई
Next Article ‘संतसाहित्य शिक्षणपद्धतीत येणे गरजेचे!’ – डॉ. विजय लाड
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

6 February 2026

चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आमदार शंकर जगताप

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार  पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  वकिलांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी…

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

6 February 2026

चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आमदार शंकर जगताप

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.