पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग
यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांना स्वच्छता जनजागृती संदेश देण्यात आला.
“स्वच्छ परिसर — सुंदर शहर”रहाटणी येथील वीर संभाजी गार्डन येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आणि न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता इंडियन मोहीमेचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शहराची स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, याची जाणीव करून देण्यासाठी खालील महत्त्वाचे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत
ओला व सुका कचरा वेगळा करा कचरा योग्य पद्धतीने संकलनासाठी द्या रस्ते, परिसर व सार्वजनिक ठिकाणी घाण टाकणे टाळा स्वच्छतेबाबत मुलांमध्ये आणि समाजात जागरूकता निर्माण करा
“स्वच्छता म्हणजे केवळ जबाबदारी नाही,
तर आपला संस्कार आहे.”
या मोहिमेमध्ये शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे संस्थेचे संस्थापक श्री अरुण चाबुकस्वार ह्यांच्याकडून आव्हान करण्यात आले आहे.

















