Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»दर १० मीटरला एक देशी झाड! शहर हरित करण्यासाठी महापालिकेचा नाविन्यपूर्ण उपक्रम
ताज्या घडामोडी

दर १० मीटरला एक देशी झाड! शहर हरित करण्यासाठी महापालिकेचा नाविन्यपूर्ण उपक्रम

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com2 August 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा दर दहा मीटर अंतरावर देशी वृक्ष लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या क्षेत्रामध्ये काही भागात विकसित झालेल्या रस्त्यांवर दुतर्फा झाडे दिसून येत नव्हती. त्या अनुषंगाने पावसाळ्यात हा नाविन्यपूर्ण उपक्रम महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आला आहे.

निगडी प्राधिकरणाप्रमाणेच शहरातील इतर भागातील बीआरटी तसेच अन्य विकसित रस्त्यावर हिरवेगार वृक्ष असावेत, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महापालिकेच्या हद्दीतील ज्या रस्त्यांवर हरित आच्छादनाचे प्रमाण कमी आहे, अशा रस्त्यांना वृक्षारोपण करताना प्राधान्य देण्यात येत आहे. या रस्त्यांवर पदपथ शेजारील जागांमध्ये दर दहा मीटर अंतरावर पर्यावरणदृष्ट्या फायदेशीर व स्थानिक हवामानाशी सुसंगत अशा देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येत आहे.

याशिवाय रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सार्वजनिक मोकळ्या जागांवरदेखील वृक्षारोपण करण्यात येणार आहे. शहर हिरवेगार व निसर्गसंपन्न करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिकेचा उद्यान व वृक्षसंवर्धन विभाग प्रयत्नशील आहे.

या वृक्षांची करण्यात येत आहे लागवड

रस्त्यांच्या दुतर्फा लावण्यात येणाऱ्या देशी प्रजातींच्या वृक्षांमध्ये कडुलिंब, ताम्हण, कदंब, वड, पिंपळ, आकाशनीम, बकुळ, अर्जुन, मोहगणी, सोनचाफा, पारिजात अशा वृक्षांचा समावेश आहे. लागवड केलेल्या वृक्षांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी त्यांना बांबू ट्री गार्ड तसेच आवश्यकतेनुसार लोखंडी ट्री गार्ड बसवण्यात आले आहेत. तसेच या वृक्षांच्या देखरेखीच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात आले आहे.
…..
*प्रभागनिहाय रस्ते व पदपथ येथे केलेले वृक्षारोपण*
(आकडेवारी ३१ जुलै २०२५ पर्यंतची)
• अ प्रभाग : २०१
• ब प्रभाग : ९१०
• क प्रभाग : २०४८
• ड प्रभाग : ६५०
• ई प्रभाग : ७३१
• फ प्रभाग : ४६५
• ग प्रभाग : २३०
• ह प्रभाग : २०६

रस्त्यांच्या दुतर्फा दर दहा मीटर अंतरावर वृक्षारोपण केल्याने आपले शहर हरित व सुंदर होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाला अनेकांचे सहकार्य मिळत आहे. प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण मोहिमेत सहभागी व्हावे व शहर सुंदर व हरित करण्यासाठी सहकार्य करावे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहराच्या हरित आच्छादनात लक्षणीय वाढ होईल. तसेच प्रदूषण नियंत्रण, तापमान कमी होणे आणि पर्यावरणस्नेही शहर निर्माण करण्यास मदत होईल. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. सध्या जे रस्ते विकसित झाले आहेत, तेथे प्रत्येक दहा मीटरवर वृक्षारोपण करण्यात येत आहे. याशिवाय आगामी काळात जे रस्ते विकसित होतील, तेथेही वृक्षारोपण करण्याचे नियोजन केले आहे. आपले शहर निसर्गसंपन्न व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवायसीएम रुग्णालयात बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यास राज्य शासनाची मंजूरी
Next Article सफाई सेवक हे शहराचे खरे हिरो – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.