
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार हे लोकशाही विरोधी काम करत असून त्यांच्यामुळे लोकशाहीला मोठा धोका निर्माण झालेला आहे, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यात ज्ञानेश कुमार यांच्या काही निर्णयावर तब्बल १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले आहेत, आयोगात सत्ताधाऱ्यांना मदतीचे निर्णय घेतले जात आहेत, यावरून कष्टकरी संघर्ष महासंघाने आज आंदोलन करत ‘निवडणूक आयोग वाचवा, लोकशाही वाचवा’ असे आंदोलन करण्यात आले व ज्ञानेश कुमार यांची यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
उपाध्यक्ष राजेश माने, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, मनपा सदस्य सलीम डांगे,निरंजन लोखंडे, लाला राठोड, योगेश काकडे, बालाजी लोखंडे, इरफान चौधरी,यासीन शेख, सुनील भोसले, सहदेव होनमने,ओमप्रकाश मोरया, सागर ठोंबरे, संतोष खोडवे,देवप्पा मिटकरी, गीतांजली सोनवणे, अरुणा सोनवणे,सविता कांबळे, अनिता कुंभार यांचेसह शेकडो नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.
https://youtu.be/ixlrNNEIV9Q?si=bQao-9_4EjHC0fZB
कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात निवडणूक आयोगाच्या निर्णयांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी नखाते म्हणाले की, निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरावृत्ती एसआयआर च्या प्रक्रियेद्वारे पद्धतशीर मतदारांची नावे वगळण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला असून मतदार नोंदणी प्रक्रियेतील बदलांचा सर्वाधिक फटका मतदारांना व तरुणांना बसत आहे यात महत्त्वाचे काम ई – सिनेट सॉफ्टवेअर करत आहे. महाराष्ट्र राज्यातील शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीला आधार देत आणि आता तृणमूल काँग्रेसचे वाटोळे करण्यामध्ये निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा हात आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जनतेने आवाज उठवण्याची गरज असून ज्ञानेश कुमार यांना हाकलून देण्यात यावे असे मतही नखाते यांनी व्यक्त केले.
एसआयआर च्या नावाखाली महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश येथून प्रत्येकी २ कोटी नावे वगळण्यात आले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ९० लाख लोकांना मतदानापासून वंचित ठेवले, दिल्लीमध्ये ४७ लाख, केरळमध्ये २४ लाख, तामिळनाडू ९७ लाख, कर्नाटकात १ कोटी, तेलंगणा मधून ७३ लाख मतदारांची नावे या मतदार यादीतून वगळण्यात आलेले आहेत हे लोकशाहीला घातक ठरत आहे असे एकूण १३ कोटी पेक्षा अधिक मतदारांना यातून वगळण्यात आलेले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील ३ विधानसभा मतदारसंघांमधून ६०८९२७ मतदार वगळले गेले आहेत यातील पात्र लाभार्थ्यांना निश्चित संधी मिळाली पाहिजे. मतदानाचा महत्वाचा अधिकार काढून घेतला जात आहे. असा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली. निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेचे संरक्षण, मतदार यादीतील पारदर्शकता आणि नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांची हमी या मागण्यांसाठी आंदोलन पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
आंदोलनानंतर पिंपरी चिंचवडचे तहसीलदार जयराज देशमुख यांना शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले.
https://youtu.be/ixlrNNEIV9Q?si=bQao-9_4EjHC0fZB

















