Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»हिंजवडी आयटी पार्क व चिंचवड मतदारसंघातील वाहतूक कोंडीवर तातडीच्या उपाययोजना व्हाव्यात – आमदार शंकर जगताप यांची विधानसभेत मागणी
ताज्या घडामोडी

हिंजवडी आयटी पार्क व चिंचवड मतदारसंघातील वाहतूक कोंडीवर तातडीच्या उपाययोजना व्हाव्यात – आमदार शंकर जगताप यांची विधानसभेत मागणी

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com4 July 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Oplus_0
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील हिंजवडी आयटी पार्क व परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अपुऱ्या रस्त्यांची स्थिती व प्रशासनातील समन्वयाचा अभाव या गंभीर समस्यांकडे आमदार शंकर जगताप यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात लक्ष वेधले. या विषयावर लक्षवेधी सूचना सादर करत त्यांनी वाहनचालक व आयटीयन्सच्या दैनंदिन त्रासाबद्दल आवाज उठवला.

विधानसभेत बोलताना आमदार जगताप यांनी सांगितले की, “हिंजवडी फेज १, २ व ३ कडे येणाऱ्या नागरिकांना व आयटीयन्सना भूमकर चौक, डांगे चौक, लक्ष्मी चौक, ताथवडे, वाकड, पुनावळे, ॲम्स्टरडॅम कंपनीमार्गे जाणे भाग पडते. परिणामी, या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते. या भागात ३० मीटरचा रिंग रोड, वाकड ते फेज थ्री मुळा नदीच्या पात्रातून रस्ता विकसित करणे शक्य आहे का, असा सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला.

त्याचबरोबर, हिंजवडी आयटी पार्कमधील नागरिकांनी वाहतूक समस्येमुळे थेट न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल केली असून, त्यामुळे पीएमसी, पीसीएमसी, पीएमआरडीए आणि अन्य यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी एकच वाहतूक नियोजक (Traffic Planner) नेमण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

*सार्वजनिक वाहतुकीसाठी निधी, स्मार्ट सिग्नलिंग प्रणालीची मागणी*

शंकर जगताप यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने निधी मंजूर करून इंटेलिजंट स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल सिस्टीम लागू करण्याची गरजही व्यक्त केली. ‘Urban Plan Development’ अंतर्गत फूटपाथची रुंदी कमी करून वाहनांसाठीचा मार्ग (Carriage Way) वाढविण्याचा विचार शासन करेल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

*लवकरच उच्चस्तरीय बैठक – माधुरी मिसाळ*

या प्रश्नावर उत्तर देताना राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी, “चिंचवड आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्या गंभीर आहे. लवकरच या संदर्भात सर्व संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन संयुक्त बैठक घेण्यात येईल,” असे आश्वासन सभागृहात दिले.

तसेच, पुण्यात फर्ग्युसन रोडवर वाहतूक व्यवस्थापनासाठी राबवण्यात येत असलेल्या AI पायलट प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातही लागू करण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या मुद्द्यांवर तातडीने पावले उचलून संबंधित विभागांनी प्रभावी कार्यवाही करावी, अशी अपेक्षा मतदारसंघातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविकास आराखड्यातील अन्यायकारक आरक्षणांवर आमदार शंकर जगताप यांनी केली थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
Next Article महाराष्ट्रातील पहिला “वेस्ट टू वंडर वर्ल्ड” थीम पार्क पिंपळे सौदागरमध्ये! माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा पाठपुरावा
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.