मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे ( वय ८९ वर्ष ) यांचे सोमवारी (ता.३०) रात्री ९ वाजता खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले.
मावळ तालुक्यातील धुरंदर नेते अशी त्यांची ओळख होती. जनसंघ पासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. दोन वेळा ते मावळ मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. काही वर्षे त्यांनी विधान परिषदेचे प्रतिनिधित्व केले होते. मावळ तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, आरोग्यासह विशेषतः शैक्षणिक क्षेत्रांवर त्यांचा मोठा प्रभाव होता.

















