Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»फैसला ऑन दी स्पॉट : मौजे चऱ्होली येथील प्रस्तावित TP Scheme रद्द! – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
ताज्या घडामोडी

फैसला ऑन दी स्पॉट : मौजे चऱ्होली येथील प्रस्तावित TP Scheme रद्द! – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com18 June 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मौजे चऱ्होली येथे प्रस्तावित केलेली TP Scheme रद्द करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय शहराचा विकास सुनियोजित विकास करता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी संभ्रम करण्याची आवश्यकता नाही, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, खासदार श्रीरंग बारणे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार शंकर जगताप, माजी आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव, आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आदी उपस्थित होते.

महापालिका प्रशासनाने चऱ्होली येथे TP Scheme प्रस्तावित केली होती. त्याला शेतकरी, भूमिपुत्र आणि स्थानिक नागरिकांनी विरोध केला. भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी आमदार लांडगे यांनी पुढाकार घेतला होता आणि पाठपुरावा सुरू केला होता. दरम्यान, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे मागणी लावून धरली होती. तसेच, आंदोलनही करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी, महापलिका आयुक्त शेखर सिंह यांनी चऱ्होली TP Scheme प्रक्रियेला स्थगिती दिली होती. मात्र, स्थगिती नको, रद्द करा… अशी मागणी भूमिपुत्रांनी केली होती. तसेच, TP Scheme वरुन राजकीय संभ्रम निर्माण करण्यात येत होता. या पाश्वभूर्मीवर आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांचे जाहीर कार्यक्रमात लक्ष वेधले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी चऱ्होलीची TP Scheme रद्द करण्याची घोषणा केली. त्यामुळे चऱ्होली आणि पंचक्रोशीतील भूमिपुत्र, शेतकरी, स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पिंपरी-चिंचवडकरांच्या न्यायहक्कांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायम प्राधान्य दिले आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. चिखली TP Scheme रद्द करण्यात आली. पण, महापालिका प्रशासनाने चऱ्होलीच्या बाबतीत कार्यवाहीला स्थगिती अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे राजकीय संधीसाधुंनी भूमिपुत्र, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी ‘एक घाव दोन तुकडे’ भूमिका घेतली आणि चऱ्होलीची TP Scheme रद्दची घोषणा केली. भूमिपुत्र आणि ग्रामस्थांच्या एकजुटीचा हा विजय आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
– महेश लांडगे, आमदार, भाजप.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसाहित्यातून समाज सक्षम करण्यासाठी लेखणीची तलवार करायला हवी – महादेव जानकर
Next Article गुरुकुलममध्ये औक्षण करून केले विद्यार्थ्यांचे स्वागत
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.