Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक कानबाई उत्सवाचे आयोजन; भव्य आयोजनासाठी खान्देशी समाज एकवटला
ताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक कानबाई उत्सवाचे आयोजन; भव्य आयोजनासाठी खान्देशी समाज एकवटला

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com7 June 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शहरामध्ये यंदाचा सार्वजनिक कानबाई उत्सव मोठ्या उत्साहात आणि एकजुटीने साजरा होणार आहे. या संदर्भात शुक्रवारी, प्राधिकरणातील खान्देश मराठा मंडळ सभागृहात विविध खान्देशी समाज मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची सार्वजनिक कानबाई उत्सव आयोजनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सर्व समाज बांधवांना समान जबाबदारी देऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यावर भर देण्यात आला. अशा कार्यक्रमांमधून समाजाच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात खान्देशी समाजाचा प्रभाव वाढावा, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. तसेच, यंदाचा सार्वजनिक कानबाई उत्सव पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेता नामदेवराव ढाके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. तसेच, या सार्वजनिक उत्सवासाठी खान्देशातील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची कानबाई उत्सव समिती तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला खान्देशातील सर्व समाज मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये, ॲड. हेमंत चव्हाण, जितेंद्र पाटील, भास्कर पाटील, विठ्ठल पाटील, मनोज ब्राम्हणकर, महेंद्र गिरासे, जी.एन. मेटकर, पी.डी. शिंदे, डॉ. अशोक चौधरी, मिलींद चौधरी, पी.टी. चौधरी, अविनाश पाटील, मनोहर पाटील, देवेंद्र भदाणे, किशोर पाटील, शिवाजी पाटील, सुनील मराठे, प्रदीप पाटील, शंकर पाटील, हेमंत पाटील, जिवन चौधरी, गजानन पाटील, अमित महाले, राजेंद्र देसले, प्रदीप लाला हिरे, दिपक पाटील, किरण चौधरी, गोविंद चौधरी, सुरेश फेगडे, हेमंत झोपे, मोतीलाल भांमरे, सुनील चौधरी, कुंदन पाटील, निलेश धांडे, गिरीधर पाटील, मनोज चौधरी, जगदीश पाटील, देविदास पाटील, कल्पनाताई बागुल, रविंद्र पाटील, रविंद्र फुलपगारे, बाळकृष्ण चौधरी, तुळशीराम देसले, जयवंत पाटील, आंबादास पाटील, दिलीप चौधरी, रमेश चौधरी, नितीन पाटील, तुषार महाजन, देवेंद्र पाटील, विनोद खर्चे, अविनाश चौधरी, राजेंद्र भंगाळे, वासुदेव इंगळे, संजय इंगळे, निना खर्चे, प्रदीप पटेल, रविंद्र महाजन, भुषण पाटील, राहुल कोल्हे, आशिष राणे, जिवेश बोरोले, प्रफुल्ल चौधरी, दिपक चौधरी, दिपक महाजन, सुमित चौधरी, रविंद्र पाटील, एकनाथ अहिरे, जगदीश पाटील, हरीश अहिरे, सुरेश पाटील, विशाल पाटील, प्रशांत राणे, मधुकर पाचपांडे, अमोल पाटील, सारंग चौधरी, मनोज पाटील, संजय देसले, अरविंद सैदाणे, महेश बोरोले, भागवत झोपे, किशोर पाचपांडे, विलास महाजन, भाउसाहेब पाटील, भगवान निकम, कैलास रोटे, सोयम अस्वार यांसह अनेक खान्देशी बांधव उपस्थित होते.

बैठकीत, पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व खान्देशी मंडळांचा एक संयुक्त गट तयार करून नागरिकांचा सहभाग वाढवण्यावर चर्चा झाली. यामुळे उत्सवाला एक व्यापक स्वरूप मिळेल, अशी आशा व्यक्त करून उत्सवाच्या निमित्ताने एक भव्य मिरवणूक काढण्यात यावी. याद्वारे समाजात एकोपा वाढवून चुकीच्या विचारसरणीला सकारात्मक उत्तर देण्याबाबत भर देण्यात आला. प्रसंगी, विविध खान्देशी मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कार करून सामाजिक कार्यात योगदान वाढवण्यावर चर्चा झाली. सार्वजनिक कानबाई उत्सवाला एक सकारात्मक थीम देण्यासोबतच, लग्न समारंभांमधील अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी खान्देशी समाजाने पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. कानबाई मातेचे महत्त्व नवीन पिढीला समजावून देण्यासाठी महिला आणि तरुण वर्गाला उत्सवाची जबाबदारी देण्याचे यावेळी सूचित करण्यात आले. यंदाचा सार्वजनिक कानबाई महोत्सव “गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये नोंदवला जावा, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी हजारो-लाखो लोकांच्या संख्येने कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे.

कानबाई माता उत्सव हा खान्देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि लोकपरंपरेचा अविभाज्य भाग आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये या महोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिन्यात येणारा हा उत्सव पाच ते सात दिवस चालतो, ज्यात कानबाईची मूर्ती किंवा प्रतीकात्मक वस्तूंची स्थापना करून पूजा केली जाते. महिलावर्ग यात मोठ्या उत्साहात सहभागी होतात. दररोज सकाळी आणि सायंकाळी आरती, भजन आणि कानबाईची गाणी म्हटली जातात. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी कानबाई मातेच्या मूर्तीचे नदी किंवा जलाशयात विसर्जन केले जाते. या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी होऊन “कानबाई माता की जय” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून जातो.

पिंपरी-चिंचवडसारख्या शहरांमध्ये स्थायिक झालेल्या खान्देशी बांधवांमुळे या उत्सवाचा विस्तार होत आहे. हा कानबाई महोत्सव पिंपरी-चिंचवडमधील खान्देशी समाजाच्या एकजुटीचे आणि सांस्कृतिक सामर्थ्याचे प्रतीक ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसुधारित विकास आराखडा: मोशीत कत्तलखाना नव्हे, गोशाळा होणार! – महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे आश्वासन
Next Article मोरवाडी व कासारवाडी येथील महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन साजरा
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.