Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»10 हजारांच्या मुदत ठेवीच्या माध्यमातून राज्यातील 12 हजार पत्रकारांना 2 लाखांचे विमा कवच! – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा महत्वकांक्षी संकल्प
ताज्या घडामोडी

10 हजारांच्या मुदत ठेवीच्या माध्यमातून राज्यातील 12 हजार पत्रकारांना 2 लाखांचे विमा कवच! – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा महत्वकांक्षी संकल्प

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com28 May 2025Updated:28 May 2025No Comments5 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

प्रतिबिंब प्रतिष्ठान’चे  लोकार्पण आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2025 समारंभ उत्साहात संपन्न

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’ या सामाजिक उपक्रमाचे  लोकार्पण आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2025 समारंभ रविवारी पुण्यातील JW Marriott हॉटेल येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रेरणादायी वातावरणात पार पडला. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी मंत्री जयकुमार  गोरे, आयुषमान भारत मिशनचे डॉ. ओमप्रकाश शेटे, एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, मंत्रालय तथा विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, डिजीटल मीडिया संघाचे राजा माने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिबिंब प्रतिष्ठान संस्थेच्या ध्येयधोरणांची माहिती देण्यात आली आणि संस्थेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या विशेष समारंभात राज्यभरातून आलेल्या डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकार, संपादक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींना ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला.

चंद्रकांतदादा पाटील यावेळी म्हणाले,“डिजिटल माध्यमांनी माहितीचा प्रसार वेगवान व व्यापक केला आहे. मात्र, पत्रकारांच्या मागे उभं असलेलं कुटुंब त्याग करतं, हे विसरता कामा नये. अशा पार्श्वभूमीवर ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’ सारखी संस्था ही काळाची गरज  (An institution like ‘Pratibimb Pratishthan’ is the need of the hour)       आहे. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे ”, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी पाटील यांनी प्रतिबिंब प्रतिष्ठान मार्फत राज्यातील 12000 पत्रकारांचा विमा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली. ज्यामध्ये प्रत्येकाला 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार (    It was announced that 12,000 journalists in the state will be insured. Each of them will get an insurance cover of Rs 2 lakh) असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले, आजचा पत्रकार केवळ माहिती पुरवणारा नाही, तर समाजमन घडवणारा प्रभावी घटक आहे. ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’ ही संस्था पत्रकारांच्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांच्या कुटुंबाचाही विचार करते, ही अत्यंत स्तुत्य बाब आहे.”

जयकुमार गोरे यांनी सांगितले,“पत्रकार समाज हा समाजाचे आरसे असतो. त्यांचे योगदान मोठे असूनही त्यांच्या कुटुंबाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’ ही संस्था या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पत्रकारांच्या मुलांमध्ये आत्मविश्वास, मूल्यसंस्कार आणि स्पर्धात्मक क्षमतांचा विकास घडवण्यासाठी ही संस्था मोलाची भूमिका बजावेल.”

संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक राजा माने यांनी सांगितले,“पत्रकारिता ही केवळ माहिती पुरवण्याचे माध्यम नाही, ती समाजाचे प्रतिबिंब आहे. म्हणूनच संस्थेला ‘प्रतिबिंब’ हे नाव दिले आहे. पत्रकारांच्या मुलांसाठी एक सशक्त, सकारात्मक व्यासपीठ निर्माण करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. पत्रकार कुटुंबांसाठी हे एक विश्वासार्ह आधार केंद्र ठरेल, याची आम्हाला खात्री असल्याचे ते म्हणाले.

पत्रकार कुटुंबांसाठी ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’

पत्रकारांच्या मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिबिंब प्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. पत्रकारांचे जीवन धकाधकीचे आणि तणावपूर्ण असल्याने त्यांच्या कुटुंबाकडे, विशेषतः मुलांकडे, वेळ देणे कठीण होते. या पार्श्वभूमीवर ही संस्था शिक्षण, आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, मूल्यसंस्कार, कला-क्रीडा आणि करिअर मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांमध्ये उपयुक्त उपक्रम राबवणार आहे.

पुरस्कार विजेते – महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2025

सामाजिक, शैक्षणिक, उद्योग आणि पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कारार्थी:

डॉ. किरण सावे, पालघर – आदिवासी शिक्षण
बिग हिट मीडिया – अनुष्का सोलवट, ऋतिक मणी, अनिल मणी
सचिन वायकुळे, बार्शी – तृतीयपंथीय आणि देहविक्रय क्षेत्रातील महिलांसाठी कार्य
डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, कंधार – शिक्षण व ग्रामविकास
उमाकांत मिटकर, नळदुर्ग – भटक्या-विमुक्त विकास
मोहन डांगरे, सोलापूर – महिला सक्षमीकरण
प्रशांत मोरे, महाबळेश्वर – युवा उद्योजक
संजय कोठारी, जामखेड – सामाजिक कार्य
नामदेवराव खराडे – साखर उद्योग
स्वप्निल परदेशी – चिक्की उद्योग
विजय राऊत – शिक्षण, क्रीडा, साहित्य
संदीप शिंदे – बेघर मनोरुग्ण पुनर्वसन
शिवराम घोडके – प्रगत शेती
आतिश शिरसाट – बेवारस मनोरुग्ण पुनर्वसन
भास्कर घुले – श्री विघ्नहर साखर कारखाना
संतोष ठोंबरे – ग्रामविकास
मानसिंगराव चव्हाण – सहकारी साखर उद्योग
शुभम पसारकर – दिव्यवंदना आधार फाउंडेशन

पत्रकारिता पुरस्कार:

* सरिता कौशिक – एबीपी माझा
* साहिल जोशी – मुंबई तक
* संजीव उन्हाळे – ज्येष्ठ पत्रकार
* भारत चव्हाण – लोकमत
* दिलीप सपाटे – मंत्रालय वार्ताहर संघ

डिजिटल स्टार पुरस्कार

* नितीन पाटील – पोलीसनामा
* अश्विनी जाधव – लोकमत डिजिटल
* अभिजीत दराडे – मटा डिजिटल
* विष्णू सानप – लेटसअप
* ओमकार वाबळे – मुंबई तक

यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र यांच्या संयोजन समितीतील सदस्य,पदाधिकारी सतीश सावंत, महेश कुगांवकर, नंदकुमार सुतार, केतन महामुनी, शामल खैरनार, राजू वाघमारे, विकास भोसले, तेजस राऊत, इक्बाल शेख, दिपक नलावडे, अमोल पाटील, अजिंक्य स्वामी, गणेश हुबे, प्रशांत साळुंके यांची देखील उपस्थिती होती.

राज्यातील 12000 डिजिटल पत्रकारांना मिळणार 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण; मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची घोषणा

पुणे | प्रतिबिंब प्रतिष्ठान आणि डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आयोजित महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण समारंभात एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्यातील 12000 डिजिटल पत्रकारांसाठी 2 लाख रुपयांच्या अपघाती विमा संरक्षण योजनेची घोषणा केली.

पत्रकारांच्या अनिश्चित आणि अल्प उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर ही विमा योजना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, डिजिटल पत्रकारांच्या मागण्या योग्य आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारकडून संवेदनशील पावले उचलली जातील. मध्य प्रदेशने ज्या सवलती दिल्या आहेत त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन महाराष्ट्रात योजना राबवली जाईल.

ही विमा योजना प्रत्येक पत्रकाराच्या दहा हजार रुपयांच्या एफडीच्या माध्यमातून कार्यान्वित होणार आहे. त्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी 40 रुपये अपघाती विमा आणि 520 रुपये आरोग्य विमा प्रीमियम भरण्यात येणार आहे. अपघाती मृत्यू अथवा अंगविकृती झाल्यास संबंधित पत्रकाराच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.

मंत्री चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले, “पत्रकारांचे उत्पन्न मर्यादित आहे. त्यांचे पाल्य शिक्षण कसे घेतील, आई-वडिलांचा औषध खर्च कसा भागवतील, यासाठी सरकारने त्यांच्या पैशांची बचत करणे म्हणजेच कमाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा योजनांची अंमलबजावणी अत्यावश्यक आहे.

ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी ट्रस्ट व देणगीदारांची मदत घेण्यात येणार असून, ही योजना केवळ घोषणा राहणार नाही तर प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे,असेही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केले.

या घोषणेसह पत्रकारांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’चा लोकार्पण सोहळा आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार समारंभ पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास विविध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, संपादक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘त्या’ प्रकरणांशी माझा काहीही संबंध नाही – संकेत सुरेश चौँधे
Next Article युवा पिढीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य पुढे नेणे गरजेचे  – भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न  काटे
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.