Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पादचारी व सायकलस्वारांसाठी रस्ते अधिक सुरक्षित बनवण्यास दिले जात आहे प्राधान्य ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्पांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे काम सुरू
ताज्या घडामोडी

पादचारी व सायकलस्वारांसाठी रस्ते अधिक सुरक्षित बनवण्यास दिले जात आहे प्राधान्य ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्पांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे काम सुरू

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com27 May 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील प्रमुख रस्ते अधिक सुरक्षित व सर्वसमावेशक बनवण्याच्या दृष्टिने ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत दापोडी, निगडी प्राधिकरणसह शहरातील विविध भागातील रस्ते नागरिकांसाठी सुरक्षित, वाहतुकीच्या सुरळीत संचलनासाठी बनवण्यात येत आहेत. या रस्त्यांवर सलगपणे चालताना पादचाऱ्यांना सुरक्षिततेबाबत कोणतीही अडचण येणार नाही, याला प्राधान्य दिले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना नागरिकांना/पादचाऱ्यांना सलगपणे समपातळीत सुरक्षित रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीशी सुसंगत हे रस्ते असतील, याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर देखील पादचारी नागरिकांसाठी विनाअडथळा फुटपाथ, स्वतंत्र सायकल ट्रॅक, बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासोबत सुरक्षितपणे नागरिकांना रस्ता ओलांडता येईल, यादृष्टिनेही उपाययोजना करण्यात येत आहेत. हा प्रकल्प राबवताना पथदिवे, चौकांची नव्याने रचना, सेवा वाहिन्या याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. ही सर्व कामे ‘इंडियन रोड्स काँग्रेस’ (आयआरसी) च्या मानकांनुसार केली जात आहेत.

पॅरिस, कोपनहेगन आणि अ‍ॅमस्टरडॅम अशा शहरांनी पादचारी आणि सायकलस्वार यांच्यासाठी रस्त्यावर प्रवास सुरक्षित असावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. या शहरांप्रमाणेच आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका पादचारी व सायकलस्वारांसाठी सुरक्षित रस्ते बनवण्यास प्राधान्य देत आहे.

पादचारी व सायकलस्वारांचे करण्यात आले सर्वेक्षण

‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ या प्रकल्पाचा आराखडा तयार करताना नागरिक, निवासी संस्था, विक्रेते, दुकानदार, वाहतूक पोलीस आदी सर्व घटकांशी सविस्तर सल्लामसलत करण्यात आली. नागरिकांचे अभिप्राय घेऊन ते रस्त्याच्या नियोजन व रचना प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

आयटीडीपी इंडिया संस्थेने पादचारी आणि सायकलस्वारांचे सर्वेक्षण केले. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर केलेल्या सर्वेक्षणात ७९ टक्के नागरिकांनी सांगितले की, रस्त्यांची रचना सुधारली गेल्यास सायकल चालवणे व फुटपाथवरून पायी चालण्याचे प्रमाण वाढेल. ८७ टक्के नागरिकांनी रस्त्याची सुरक्षित रचना आणि जागेचे पुनर्वितरण करण्यास पाठिंबा दिला. ८७ टक्के नागरिकांना रस्ता ओलांडताना असुरक्षित वाटत असल्याचे मत व्यक्त केले. ८२ टक्के नागरिकांनी सध्याचा रस्ता मुलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांना असुरक्षित असल्याचे सांगितले. ७६ टक्के नागरिकांना रात्री प्रवास करताना समस्या जाणवत होत्या तर ५९ टक्के नागरिकांनी अति वेगाने जाणारी वाहने ही मोठी समस्या असल्याचे मत मांडले.

या सर्वेक्षणाबाबत आयटीडीपी इंडियाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रांजल कुलकर्णी यांनी सांगितले की, पादचारी व सायकलस्वार यांच्यासाठी प्रामुख्याने हा सर्व्हे होता. तर, ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्पांतर्गत रस्त्यांचे फक्त सौंदर्यीकरण करण्यावर भर दिला जात नाही, तर हा प्रकल्प पादचारी व सायकलस्वारांसाठी सुरक्षित रस्ते देण्याच्या दृष्टिने व्यापक प्रक्रिया आहे, असे आर्किटेक्ट-अर्बन डिझायनर प्रसन्ना देसाई यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे रस्ते केवळ वाहनांसाठी नाही तर पादचारी, सायकलस्वार यासह सर्वांसाठी सुरक्षित असतील, याकडे प्राधान्याने लक्ष देत आहोत. शहरातील रस्ते सुरक्षित करण्याच्या दृष्टिने ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्प उपयुक्त ठरत आहे. रस्त्यांची कामे करताना सार्वजनिक-खासगी वाहनांसोबतच पादचारी, सायकलस्वार नागरिक यांचाही विचार केला जात आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड शहरातील काही भागातील रस्ते अरुंद झाल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानंतर वाहनचालकांप्रमाणेच पादचारी, सायकलस्वार यांनाही रस्त्यांवरील प्रवास सुरक्षित करून देणे यास प्राधान्य देऊन आम्ही रस्त्याच्या लगत असलेली व वापरात नसलेल्या जागेचे पुनर्वितरण करून आणि पार्किंग व वाहन मार्गांची योग्य रचना करून रस्ते अधिक सुरक्षित व वाहतूक सुरळित होण्यासाठी उपयुक्त ठरतील, असे बनवण्यास प्राधान्य देत आहोत.
– बापूसाहेब गायकवाड, सह शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

शहरात दर १०० लोकांमागे ९० खासगी वाहने आहेत. त्यामुळे वाहतूक तज्ज्ञांचे मत आहे की, रस्ते रुंद करणे ही शाश्वत उपाययोजना नाही. असा उपाय करणे तात्पुरता मार्ग आहे. या समस्येवर दीर्घकालीन उपाय करण्याच्या दृष्टिने ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्प प्राधान्याने राबवला जात आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीसोबतच, पादचारी, सायकलस्वार यांचाही विचार करण्यात आला आहे.
– सुनिल पवार, कार्यकारी अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleप्रशासकीय कामांमध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर नागरी सेवा सुलभीकरणाला गती देणारा – संकेत भोंडवे
Next Article विरोधकाच्या रचनात्मक मांडणीचे स्वागत करणारे पंतप्रधान म्हणजे नेहरू – काशिनाथ नखाते
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.