Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»आठवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन उत्साहात साजरे
ताज्या घडामोडी

आठवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन उत्साहात साजरे

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com19 May 2025No Comments6 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

नक्षत्राचं देणं काव्यमंचचे २५ रौप्य महोत्सवी वर्ष महाकाव्यसंमेलनाने संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – नक्षत्रचं देणं काव्यमंच,मुख्यालय ,भोसरीच्यावतीने नुकतेच ‘आठवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०२५’ अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव, पुणे येथे साजरे झाले. या महाकाव्यसंमेलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक कवी कवत्रिंनी आपली उपस्थिती दाखवून, हे महाकाव्यसंमेलन यशस्वी केले. संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्षे असल्याने या आठव्या महाकाव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

दोन दिवसाच्या या महाकाव्यसंमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ बोल्ड कवी म.भा. चव्हाण पुणे हे उपस्थित होते. तसेच या महाकाव्यसंमेलन च्या व्यासपीठावरून शिवव्याख्याते प्रा. नामदेवराव जाधव, प्रा. तुकाराम पाटील, श्रीकांत चौगुले, डॉ.शांताराम कारंडे, डॉ. अलका नाईक, सुखदेव तात्या सोनवणे, राजेंद्र धावते, सुरेश कंक, सुभाष चव्हाण, कैलास भैरट, प्रा. सुरेखा कटारिया, कल्पना बंब,ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर इ. अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

महाकाव्यसंमेलनाची सुरुवात दि. १७ मे रोजी काव्यग्रंथदिंडीने करण्यात आली. मराठी भाषेच्या जय घोष करत . काव्य ग्रंथ दिंडी सभागृहा पर्यंत काढण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन पर्यावरण संदेश देत. वृक्ष पूजन करून ,झाडाला पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते महाकाव्यसंमेलन उद्घाटन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर महाकाव्यसंमेलनाध्यक्ष बोल्ड कवी म.भा. चव्हाण, डॉ. शांताराम कारंडे, डॉक्टर अलका नाईक इ. उपस्थित होते. यामहाकाव्यसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन डॉ. श्वेता राठोड यांनी केले. सर्व मान्यवरांच्या संस्थेच्या वतीने स्मृतीचिन्ह,गुलाब पुष्प ,शाल देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी महाकाव्यसंबंधाची प्रस्ताविक नक्षत्राचं देणं काव्यमंचचे संस्थापक ,राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले.
यावेळी ते म्हणाले की,”कविता आदर व सन्मान मिळण्यासाठी पंचवीस वर्षांपूर्वी या संस्थेची १ जानेवारी १९९९ या शुभदिनी स्थापना केली. संपूर्ण महाराष्ट्रात या संस्थेने आपल्या कार्याचा विस्तार केला. एक विचारवंत ,कवी ,साहित्यिक या मंचाशी जोडले गेले. एक चांगल्या माणसांची मोठी चळवळ या माध्यमातून उभी राहिली. अनेक अडचणी आणि अनेक संघर्ष करत संस्थेची वाटचाल प्रेरणादायक आहे. संकटांनो याद राखा..! या कवीशी गाठ आहे. असे सांगून त्यांनी संस्थेच्या विविध कामांचा आढावा घेतला. काव्य सहली ,काव्य कार्यशाळा ,गझल कार्यशाळा ,श्रावणी मैफल , राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा ,वासंतिक काव्य मैफल, प्रेम काव्य मैफल, काव्यसंग्रह प्रकाशन,गड किल्ले, निसर्गाच्या सानिध्यात निघणाऱ्या विविध सहलीं आणि कवींना एक आदर मिळून देणारे व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे पंचवीस वर्षाची वाटचाल केवळ कवितेसाठी काम करणारी महाराष्ट्रातील एक क्रियाशील संस्था राहिली. त्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.”

यावेळी महाकाव्यसंमेलनाचे संमेलनाध्यक्ष बोल्ड कवी म.भा. चव्हाण म्हणाले की,”कविता म्हणजे एक आनंदाचं ठिकाण आहे. मनाला उभारी देणार माध्यम आहे. ज्यांना कवितेचा स्पर्श केलेली माणसे आनंदी होतात. संस्थेने २५ वर्ष हा काव्याचा यज्ञ तेवत ठेवून समाजातील संवेदशीलता जपण्याचं काम केलं आहे. एखाद्या संस्थेचा एवढा मोठा कार्यकाल म्हणजे त्या कार्याची सातत्यपूर्ण असलेली पावतीच आहे. मानवतावादी दृष्टिकोन ठेवून संस्था काम करत आहे. चांगल्या माणसांचा समूह या माध्यमातून समाजामध्ये घडत आहे. आणि कवींना घडवण्याचं काम या व्यासपीठांनी केला आहे. अनेक कवी साहित्यिक आणि विचारवंत या व्यासपीठावरून पुढे आलेले आहे. नवोदित कवींच्या हक्काचा आणि सन्मानाचं व्यासपीठ म्हणून या व्यासपीठाकडे समाजातून पाहिले जाते. मी गेले या संस्थेच्या २५ वर्षाच्या वाटचालीचा साक्षीदार आहे. अनेक चांगल्या माणसांचा समूह म्हणजेच ही संस्था म्हणायला काही हरकत नाही. समाजातील संवेदनशीलता टिपण्याचे काम .या माध्यमातून केले गेले आहे. संस्थेच्या विविध कार्यक्रमामुळे मराठी भाषेची अस्मिता जागृत ठेवण्याचं काम आणि मराठी भाषेची समृद्धता वाढवण्याचे काम या संस्थेने सातत्यपूर्ण केले आहे. या संस्थेला शासन दरबारी मान्यता देऊन ,तिच्या कार्याची दखल घेऊन ,संस्थेला भरीव अशा प्रकारचे सहकार्य केले पाहिजे. अनेक माणसांचा समूह जोडणारी ही समाजातील क्रियाशील संस्था आहे. भविष्यातील न विचाराची क्रांती या व्यासपीठावरून नक्कीच होईल. त्यानिमित्त मी अपेक्षा व्यक्त करतो. तळागाळातील, खेडोपाडी आणि वाडीवस्तीतील कवी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे .संपूर्ण महाराष्ट्रातून या कवींची उपस्थिती म्हणजेच ,संस्था कुठपर्यंत पोहोचली आहे. याची पावती मिळते. पिंपरी चिंचवड कवितेची राजधानी करणारी ही संस्था सर्वांच्या कौतुकास पात्र आहे.”

याप्रसंगी डॉ.शांताराम कारंडे, डॉ. अलका नाईक, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर उपस्थित होते.

यावेळी प्रा. नामदेवराव जाधव यांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली.ते म्हणाले की,”मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. ही आनंदाची बाब आहे. परंतु भाषेला अभिजात दर्जा सरकार दरबारी ठीक आहे. परंतु ती अभिजातच होती .तिला अनेक वर्षांची परंपरा आहे. मराठी भाषेला जपणे, वाढवणे आणि तिची वाढ करणे .ही आपली जबाबदारी या निमित्ताने वाढत आहे. नक्षत्राचं देणं काव्यमंच सारख्या संस्था मराठी भाषेच्या विकासासाठी गेली २५ वर्षे काम करतात .ही खरं अभिमानाची गोष्ट आहे. या संस्थेच्या पाठीमागे सरकार दरबारी आणि समाजाने उभे राहून यांच्या कामाला साथ दिली पाहिजे. मी या कार्यक्रमासाठी केवळ मराठीचा कार्यक्रम आहे. मराठी भाषेचा कार्यक्रम आहे .मराठी माणसाचा कार्यक्रम आहे .यासाठी आवर्जून उपस्थित आहे. भविष्यातील अनेक परिवर्तनाच्या गोष्टी या व्यासपीठावर घडतील अशी मला आशा आहे. संस्थेचे काम हे प्रबोधनात्मक आणि समाजाला जागृत करणारे आहे. संस्थेच्या कार्याला माझे नेहमी सहकार्य राहील.”

या महाकाव्यसंमेलनामध्ये आलेल्या संपूर्ण कवींना चहा, नाष्टा ,भोजन ,निवास व्यवस्था ही विनामूल्य करण्यात आली होती. प्रत्येक सहभागीला स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र ,शाल,गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

दोन दिवसांच्या या महाकाव्यसंमेलनात पहिल्या दिवशी दि.१७ मे २०२५ मध्ये पाच काव्य मैफल व दोन परिसंवाद संपन्न झाले.
तसेच दुसऱ्या दिवशी दिनांक १८ मे २०२५रोजी दुसऱ्या दिवसाच्या 17 चे अध्यक्ष प्राध्यापक तुकाराम पाटील हे होते.
यावेळी तुकाराम पाटील यांनी आपल्या मनोगतना त असे म्हटले की,”पंचवीस वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेच्या कार्याचा मी साक्षीदार असून इथे पिंपरीचे शहरात काही नव्हतं तेव्हा ही संस्था कार्य करायला सुरुवात केली होती ही संस्थेचा विस्तार फक्त पिंपरी चिंचवड शहरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात आणि बाहेर सुद्धा विस्तार झाला आहे. आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये अनेक साहित्यिकांना वेगळ्या पद्धतीचे मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे. अनेक अनुभवाच्या माध्यमातून संस्थेने आपली यशस्वी वाटचाल केलेली आहे. संस्थेचे अध्यक्ष कवी वादळकार प्रा. राजेंद्र सोनवणे सारखा माणूस कवितेसाठी आपले आयुष्य बहाल करतो .ही एक समाजाने दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. एका ध्यासाने आणि ध्येयाने काम करणारी, मला वाटतं महाराष्ट्रातली एकमेव संस्था असावी. अनेक अडचणी अनेक संघर्ष आणि अनेक यशस्वीतेचे पैलू, मी पाहिलेले विविध स्तरातून संस्थेने आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. मला अभिमान आहे. मी या संस्थेच्या सोबत गेले अनेक वर्ष जोडलेला आहे. समाजातील चांगल्या माणसांना घडवणारी ही संस्था आहे. विशाल दृष्टिकोन ठेवून सर्वांमध्ये आदराची आणि प्रेमाची भावना निर्माण केलेली हीद संस्था आहे. तिच्या पुढील कार्याला माझ्या सदैव शुभेच्छा आहेत.”
दुसऱ्या दिवशीच्या सत्र मध्ये तीन काव्य मैफल व एक परिसंवाद याच्यामध्ये घेण्यात आला.

समारोपाच्या कार्यक्रमांमध्ये महाकाव्यसंमेलनाचे संमेलनाध्यक्ष बोल्ड कवी म.भा. चव्हाण यांना संस्थेच्या वतीने मानपत्र, गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व पंचवीस हजाराची मानधन ठेवली घेऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी सुखदेव तात्या सोनवणे, श्रीकांत चौगुले, सौ प्रीती सोनवणे, प्रा.तुकाराम पाटील, बंडोपंत बोढेकर, अंजू सोनवणे, वृषाली टाकळे, जया बोरकर, डॉ. अलका नाईक इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महाकाव्यसंमेलनाध्यक्ष कवी म.भा.चव्हाण, पुणे यांच्या शुभहस्ते सहभागी झालेल्या प्रत्येक कवीला आणि कवयित्रींना गौरवचिन्ह ,सन्मानपत्र ,
गुलाबपुष्प व शाल देऊन गौरवण्यात आले.
दोन दिवसाच्या सोहळ्यामध्ये सर्वजण भारावून गेले. दोन दिवसांचा हा सोहळा अतिशय उत्साहामध्ये हा सोहळा निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव ,पुणे येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये यशवंत घोडे, बालाजी थोरात, सुनिल बिराजदार, नवनाथ पोकळे, डॉ. गिरीश सकपाळ, बबन चव्हाण, दिगंबर वाघिरे, विनायक विधाटे,प्रणव रोकडे, सुहास जगताप, सचिन कुलकर्णी, डॉ. पांडुरंग भोसले, रूपाली भालेराव, दिव्या भोसले, नरेंद्रकुमार चव्हाण,
जुली यादव, सुरेखा कटारिया, सुरेश कंक, नरेंद्र कुमार चव्हाण , सतिश कांबळे, प्रमोद डोंगरदिवे, सुभाष चव्हाण, नितीन लोणारी,सलीम नायकोडी, राजू वानखेडे, दत्तात्रय गायकवाड, प्रकाश दळवी, अक्षय पवार, विवेक कुलकर्णी, साईराजे सोनवणे, किरणताई मोरे, राधाताई वाघमारे इ.नी महाकाव्यसंमेलनाच्या संयोजनामध्ये सहभाग घेऊन यशस्वी केले.

या कार्यक्रमाचा समारोप विश्वगीत पसायदानाने करण्यात आला. या महाकाव्यसंमलनाचे संपूर्ण संयोजन , आयोजन आणि नियोजन नक्षत्राचं देणं काव्यमंचाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी यशस्वी केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article“एकत्र निवडणुका आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारांबाबत चर्चा करताना वस्तुनिष्ठ भूमिका आवश्यक” – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Next Article खासदार श्रीरंग बारणे यांनी प्राधिकरणातील ‘ऑक्सिजन पार्क’ला दिली भेट
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.