Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पीएमआरडीएच्या उपक्रमांचा राज्यभरात डंका
ताज्या घडामोडी

पीएमआरडीएच्या उपक्रमांचा राज्यभरात डंका

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com17 May 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने गत काही दिवसात नागरिकांसाठी उभारलेल्या उत्कृष्ट सेवा – सुविधांची शासनाने दखल घेत मुख्यमंत्री – १०० दिवस कृती आराखड्याच्या उपक्रमात पीएमआरडीएला महाराष्ट्रात तिसरे स्थान मिळाले. गुणवत्ता परिषद भारत (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया QCI) यांनी केलेल्या अंतिम मूल्यांकनात पीएमआरडीएला १०० पैकी ७६.०२ गुण मिळाले.

पीएमआरडीएने अल्प कालावधीतच सर्वसामान्य नागरिकांचे हित केंद्रस्थानी ठेवून उभारलेल्या अपेक्षित सोयी सुविधा आणि प्रशासकीय कामकाजातील गतीमानतेच्या आधारावर राज्य शासनाने त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीवर शुक्रवारी (दि.१६) शिक्कामोर्तब केले. प्रशासकीय कामकाजातील नाविन्यता, लोकाभिमुख प्रशासन व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब अशा काही मुद्द्यांच्या आधारे पीएमआरडीएने आपले वर्चस्व या विशेष कार्यक्रमातून सिद्ध करत राज्यभरात अल्पावधीतच आपली छाप सोडली.

मुख्यमंत्री – १०० दिवस कृती आराखड्याच्या या दुसऱ्या टप्प्यातील विशेष उपक्रमात पीएमआरडीएसह राज्यभरातील ९५ महामंडळे, प्राधिकरणे, शासकीय / निमशासकीय संस्था, कंपन्या आदींचा समावेश होता. केंद्र शासनाची नामांकन करणारी अव्वल संस्था असलेल्या क्यूसीआय टीमने १४ मे २०२५ रोजी १० महत्त्वपूर्ण मुद्द्यांच्या अनुषंगाने केलेल्या मूल्यमापनात पीएमआरडीएने बाजी मारली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या निकालात ७६.०२ गुणांच्या आधारे पीएमआरडीएला राज्यातून तिसरे स्थान मिळाले. पहिल्या क्रमांकावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ८२.१६ गुणांसह प्रथम तर महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादितने ७७.१९ गुण घेत दुसरे स्थान मिळवले. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण ६६.३७ गुणांसह चौथ्या तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ६५.१४ गुण मिळवत पाचव्यास्थानी राहिले.

या निकषांवर झाले मूल्यमापन
क्यूसीआय टीमने विविध १० मुद्द्यांच्या अनुषंगाने मूल्यमापन करून आपला अहवाल राज्य शासनाला सादर केला होता. यात संकेतस्थळ, केंद्र शासनाची सुसंवाद, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सोयी सुविधा, कामकाजातील सुधारणा, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी, न्यायालयीन बाबी, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, सुकर जीवनमान, कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा या निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले.

या प्रकल्प, उपक्रमामुळे मिळाला पुरस्कार
• सुलभ, सुंदर वेबसाईट, RTS सेवांचे सुलभीकरण
• स्वच्छ व सुसज्ज ऑफीस, अधिकाऱ्यांच्या भेटीच्या वेळा निश्चित
• अभ्यागतांसाठी कार्यालयात सोयी सुविधा, स्वच्छ पाणी, प्रसाधनगृहे
• बांधकाम परवानग्यांसाठी ऑनलाईन BPMS प्रणाली
• विकास योजना व नगर रचनेसाठीच्या सूचना, हरकतीसाठी आणि ड्रोन सर्वेक्षणाला AI ची जोड
• औद्योगिक गुंतवणुकीस चालना देण्यासाठी ३१ हजार कोटींचे नियोजित पायाभूत प्रकल्प
• नदीचा उगम ते संगमापर्यंत प्रदूषण निर्मूलनासाठी उपाययोजना करणारे एकमेव प्राधिकरण
• स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद पथक (PDRF)असणारे राज्यातील एकमेव महामंडळ
• प्राधिकरण निर्मित Geoportal द्वारे विकास आराखडा, मोजणी, बांधकाम, अतिक्रमण निर्मूलन, जमीन अधिकार अभिलेख आदी सेवांचे एकत्रीकरण
• अत्याधुनिक Digital twin तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विविध विभागातील कामकाजात सुधारणा

जनहित डोळ्यासमोर ठेवून उभारलेल्या सोयी सुविधा आणि प्रशासकीय कामकाजात शासनाला अपेक्षित असलेल्या गतिमानतेच्या आधारावर पीएमआरडीएला मिळालेले हे मोठे यश आहे. मुख्यमंत्री – १०० दिवसाच्या कार्यक्रमात आमच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत आणि लोकप्रतिनिधी, नागरिकांचे सहकार्य या आधारावर पीएमआरडीएच्या निर्मितीपासून अल्पावधीतच आम्ही राज्यात नावलौकिक मिळवू शकलो हे आमच्यासाठी गौरवास्पद आहे. आगामी काळात पीएमआरडीएतील सोयी सुविधा, प्रशासकीय सेवा या अधिकाधिक लोकाभिमुख कशा करता येतील, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न असतील.
– डॉ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमआरडीए

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समतोल राखून संघटन मजबूत करणार : भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न  काटे
Next Article स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.