Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»चाकणमधील ‘त्या’ पीडीतेचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा – शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे यांची मागणी
ताज्या घडामोडी

चाकणमधील ‘त्या’ पीडीतेचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा – शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे यांची मागणी

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com16 May 2025Updated:16 May 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चाकण येथील मेदनकरवाडी भागामध्ये कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला अंधाराचा फायदा घेत रस्त्यावरून फरफटत निर्जनस्थळी नेत तीच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (१३ मे) रात्री साडेदहा वाजता घडली. या पिडीतेला न्याय मिळावा आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावी.यासाठी फास्टट्रॅक कोर्टात खटला दाखल करण्यात यावा.तसेच एमआयडीसी भागातील महिला कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कंपनी व्यवस्थापनाने योग्य सुरक्षा पुरवाव्यात. यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. उद्योगमंत्री, पोलीस प्रशासनाला पत्र देत याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे यांनी केली आहे.

याबाबत सुलभा उबाळे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे, शहर प्रमुख सरिता साने उपस्थित होत्या. दिलेल्या निवेदनात उबाळे यांनी म्हटले आहे. पीडित महिला नाईट शिफ्टसाठी कंपनीत जात होती. या दरम्यान अज्ञात इसमाने तिचा पाठलाग करत खंडोबा मंदिराजवळ तिचा रस्ता अडवला. त्यानंतर जबरदस्तीने ओढत निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या घटनेने एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षीततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हा प्रश्न आता केवळ चाकण एमआयडीसी पुरता मर्यादित राहिलेला नाही. पुणे जिल्हयामध्ये कार्यरत असणाऱ्या सपूर्ण औद्योगीक क्षेत्रामध्ये महिलांना सुरक्षा प्राधान्य करण्यासाठी ठोस पावले उचलावीत.त्याअंतर्गत संपूर्ण कंपन्यांमध्ये रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ये जा करण्यासाठी कंपनीतर्फे गाडी व सुरक्षा पुरवणे गरजेचे आहे. तसेच ज्या महिला नाईट शिफ्टमध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करतात. त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र नियमावली करणे गरजेचे आहे असे देखील सुलभा उबाळे, गीतांजली ढोणे यांनी म्हटले आहे.

फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवा

दरम्यान चाकण येथे घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. या भागामध्ये अनेक कंपन्यांमध्ये महिला काम करतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. या भागामध्ये मूलभूत सुविधांचा प्रश्न आहेच शिवाय महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील आहे त्यामुळे यामध्ये ठोस कार्यवाही व्हावी.
पुणे जिल्हयातील विविध औद्योगिक आस्थापना, लघुउद्योग या सर्वांसोबत पोलीस प्रशासन यांची बैठक घेतली जावी. हे प्रकरण संवेदनशील असल्याने तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करावा आणि पीडितेला न्याय द्यावा असे सुलभा उबाळे, गीतांजली ढोणे यांनी म्हटले आहे.

शिवसेना पीडित महिलेच्या पाठीशी*l

सुलभा उबाळे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये चाकण घटनेतील पीडित महिलेची भेट घेतली.या महिलेच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख गीतांजली ढोणे, सरिता साने शिल्पा अनपण उपस्थित होत्या.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअरविंद एज्युकेशन सोसायटीची 100 टक्के निकालाची परंपरा कायम
Next Article आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समतोल राखून संघटन मजबूत करणार : भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न  काटे
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.