चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी
श्री स्वामी समर्थ व्याख्यानमालेचा १५ मेपासून प्रारंभ

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री स्वामी समर्थ(shree swami samarth) सेवा प्रतिष्ठान, शिवतेजनगर, चिंचवड यांच्या वतीने गुरुवार, दिनांक १५ मे २०२५ पासून तीन दिवसीय श्री स्वामी समर्थ व्याख्यानमालेचा ( Shri Swami Samarth Lecture Series to begin from May 15) प्रारंभ होत असून श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, शिवतेजनगर, चिंचवड येथे रोज सायंकाळी ठीक ७:०० वाजता व्याख्यान सुरू होईल.
व्याख्यानमालेत गुरुवार, दिनांक १५ मे २०२५ रोजी ज्येष्ठ समुपदेशक दत्ता कोहिनकर ‘मनाची अमर्याद शक्ती व समाजस्वाय्थ’ या विषयावर प्रथम पुष्पाची गुंफण करतील. शुक्रवार, दिनांक १६ मे २०२५ रोजी प्राचार्य प्रदीप कदम ‘इतिहासातून आम्ही काय शिकलो?’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफतील. शनिवार, दिनांक १७ मे २०२५ रोजी प्रा. डॉ. संजय कळमकर ‘आनंदी जीवनाच्या वाटा’ या विषयाच्या माध्यमातून अंतिम पुष्पाची गुंफण करतील. नि:शुल्क असलेल्या या व्याख्यानमालेचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन माजी नगरसेवक व श्री स्वामी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांनी केले आहे.









