ताज्या घडामोडीपिंपरी

बांधकाम मजुरांनी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा – बाबा कांबळे

बांधकाम मजुरांसाठी कष्टकरी कामगार पंयाचतचे विशेष अभियान - साहित्य व योजनेबाबत जनजागृती

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र सरकारच्‍या वतीने बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविल्‍या जात आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले आहे. या योजनेसाठी अर्ज करताना काही अडचणी आल्‍यास संपर्क साधण्याचे आवाहनही बाबा कांबळे यांनी केले आहे.

बांधकाम कामगारांच्‍या योजनांची जनजागृती करून योजनांचा लाभ कामगारांना मिळावा म्‍हणून कष्टकरी कामगार पंचायतच्‍या वतीने शहरात बांधकाम मजून जनजागृती विशेष अभियान राबविले जात आहे. या योजनेअंतर्गतन कामगारांमध्ये योजनांची जनजागृती केली जात आहे. पिंपरी येथे आयोजित कार्यक्रमात या अभियांनातर्गत बाबा कांबळे यांनी बांधकाम कामगारांना मार्गदर्शन केले.

या वेळी कष्टकरी कामगार पंचायतचे जिल्हा अध्यक्ष राजू सावळे, शहराध्यक्ष मुकेश ठाकूर, उपाध्यक्ष दिनेश यादव, खजिनदार सुखदेव पंडित, सचिव महेंद्र कुमार यादव, उमेश सिंग, महेंद्र,सिंग, किसन लोखंडे, कुलदेव राय, राजू मस्करे, सहदेव मंडल आदी यावेळी उपस्थित होते.

बाबा कांबळे म्‍हणाले की, बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. या कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम मजुरांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यात नोंदणी केल्या नंतर त्यांना घरगुती भांड्याचे साहित्य मिळतात, कोण कोणते साहित्य मिळते या बाबत या कार्यक्रमात माहिती देण्यात आली, बांधकाम मजूर महिलेला मिळालेले साहित्य उपस्थितांना दाखवण्यात आले,बांधकाम मजुरांसाठी राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजना मजुरांपर्यंत पोचणे गरजेचे आहे. मात्र अनेकदा कामगार या पासून वंचित राहत आहेत. त्‍यांना योजनांचा लाभ मिळावा. त्‍यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी कष्टकरी कामगार पंचायतीच्‍या वतीने विशेष अभियान राबवले जात आहे. या अभियानाच्या निमित्ताने बांधकाम मजुरांना मिळणाऱ्या साहित्याबद्दल माहिती देऊन जनजागृती केली जात आहे. या योजनेचा बांधकाम मजुरांनी लाभ घ्यावा. काही अडचणी आल्‍यास संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना महिला घरकाम सभेच्‍या अध्यक्षा आशा कांबळे यांनी केली. आभार कष्टकरी कामगार पंचायत सचिव मधुरा डांगे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button