बालगंधर्व रंगमंदिरात भरवलेल्या चित्र प्रदर्शनास गर्दी

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बालगंधर्व रंगमंदिर कलादालनामध्ये सुमारे आठ ते नऊ कलाकारांनी सहभाग घेऊन नुकतेच चित्र व छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी चित्र प्रेमिनी गर्दी केली होती.
या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार मुरली लाहोटी यांच्या हस्ते नुसतेच झाले. कार्यक्रमाच्या वेळी श्री लाहोटी यांनी दीप प्रज्वलन केले. सहभागी चित्रकार शशिकांत डोळस यांनी सूत्रसंचालन केले. अरुण काळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गणेश ढोले प्रमोद कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमा वेळी श्री लाहोटी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व सहभागी कलाकारांचे कौतुक केले .
“कलाकारांनी एकत्र येऊन आपल्या कलेची जोपासना करायला हवी ही काळाची गरज आहे असे ते म्हणाले.”
हे प्रदर्शन 23 एप्रिल 2025 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये संपन्न झाले. यात निसर्ग चित्र,अमृत चित्र रचनात्मक चित्र, व्यक्तिचित्र अशा विविध चित्रांचा समावेश या प्रदर्शनात होता. छायाचित्रकार प्रदीप डोळस यांची अनेक छायाचित्रांचा समावेश या प्रदर्शनात आहे.
या प्रदर्शनात चित्रकार शशिकांत डोळस, अरुण काळे, गणेश ढोले, प्रताप सिंह शिंदे, राहुल वाघमारे, प्रमोद कांबळे, सिद्धार्थ इंगळे, प्रदीप डोळस, प्रज्ञा कांबळे या सर्व कलाकारांचा सहभाग आहे.गणेश ढोले यांनी आभार मानले.













