ताज्या घडामोडीपिंपरीपुणेमहाराष्ट्र

शिवसेना पक्षाच्या संघटन बळकटीकरणाच्या दृष्टीने पुणे जिल्हा महिला आघाडीची आढावा बैठक

Spread the love

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना पक्षाच्या संघटन बळकटीकरणाच्या दृष्टीने पुणे जिल्हा महिला आघाडीची भव्य व सुसंघटित आढावा बैठक पुणे येथील शिवसेना भवन, मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीचे आयोजन चारही लोकसभा मतदारसंघांतील पक्षस्थिती, महिला आघाडीची बांधणी, सदस्य नोंदणी अभियान व आगामी निवडणुकांच्या रणनीती यावर लक्ष केंद्रित करून करण्यात आले होते.

या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीस शिवसेना नेत्या मीना कांबळी, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, विधान परिषद आमदार मनीषा कायंदे, शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रे, माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, आणि पुणे जिल्हा महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या बैठकीस पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांतील महिला आघाडीच्या पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, तालुका आणि शहरप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बैठकीत पक्षप्रमुख व राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाने महाराष्ट्रभर राबवलेल्या “सदस्य नोंदणी अभियान” यशस्वी करण्यासाठी महिला आघाडीचे कार्य अधिक गतिमान करण्याचा निर्धार करण्यात आला. विशेषतः पुणे जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या, स्वयंसेवी संस्थांशी संलग्न कार्यकर्त्या यांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी वाढवण्याचा कार्य आरंभ करण्यात येणार आहे.
या बैठकीत राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना जसे की महिला आर्थिक स्वावलंबन योजना, शासकीय अनुदानित व्यवसाय योजनेचा लाभ, बचत गट संघटन, आरोग्य सुविधा, महिला सुरक्षेसाठीच्या उपाययोजना या योजनांचा तळागाळात प्रचार व प्रसार करून, महिला सक्षमीकरणास चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यात पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिला आघाडीची नव्याने संघटन बांधणी,पक्षाच्या धोरणांचा प्रचार व प्रचारकी साहित्याचा वापर करून गावा-गावात कार्यकर्त्यांना सक्रिय करणे, महिला नेतृत्वाला व्यासपीठ देण्यासाठी विशेष कार्यशाळा, प्रशिक्षण सत्र व संवाद दौऱ्यांचे आयोजन,स्थानिक पातळीवर महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर शिवसेना महिला आघाडीच्या नेतृत्वात कार्यक्रमांची आखणी, बैठकीदरम्यान मान्यवरांनी महिला कार्यकर्त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगून, आगामी निवडणुकीसाठी महिला आघाडीचा प्रभावी सहभाग आणि नेतृत्व हे पक्षासाठी निर्णायक ठरणार असल्याचे अधोरेखित केले.

शिवसेना महिला आघाडी ही पक्षाची आत्मा आहे. जिल्हा, तालुका व शहर पातळीवर महिला आघाडीची रचना अधिक प्रभावीपणे उभारून, पुणे जिल्ह्याला पक्ष संघटनात अग्रस्थानी नेण्याचा ठाम निर्धार या बैठकीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button