चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने चिंचवड येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने चिंचवड येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

शिका व संघटित व्हा! हा बाबासाहेबांचा विचार अंगीकारून त्त्यांच्या जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली व शालपयोगी वस्तू वाटप करण्यात आले.
वूई टुगेदर फाउंडेशन कायमच असे विविध लोकपयोगी व गरजुना निस्वार्थी मदतीचा हात देणारे उपक्रम घेत असतात.जे जे श्यक्य होईल ते ते करण्याचा प्रामानिक प्रयत्न असतो तो पुढेही कायम राहील आम्ही सर्व मान्यवर एक कुटुंब म्हणून कायम एकीने निस्वार्थी काम करीत असतो आदी आपल्या भावना व्यक्त करीतफाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी या उपक्रमाबाबत व नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.

सल्लागर रवींद्र सागडे,खुशाल दुसाने,जयंत कुलकर्णी, यांनी आपले विचार व्यक्त केले.

आजच्या दिवशी फाउंडेशनच्या वतीने बाराही महिने नवीन ,जुन्या सायकल संकलन करून गरजू विद्यार्थी किंवा होतकरू मुळे यांना मोफत सायकल वाटप उपक्रम घ्यायचा संकल्प केला आहे.फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे सह- सचिव मंगला डोळे – सपकाळे,नंदकुमार वाडेकर,आदिनी शालेय साहित्य उपलब्ध करून दिले.तर मेट्रोपोलिटिन सोसायटीने काही सायकली उपलब्ध करून दिल्या.

सलीम सय्यद, मंगळा डोळे सपकाळे, रवींद्र सागडे, शंकरराव कुलकर्णी, अर्जुन पाटोळे, सलीम सय्यद, नंदकुमार वाडेकर, दिलीप चक्रे, श्रीनिवास जोशी, विलास गटने, जयंत कुलकर्णी, सदाशिव गुरव, मच्छिन्द्र थोरवे,अर्चना बच्चे,श्रावणी बच्चे,यश डोळे,खुशाल दुसाने,रोहिणी बच्चे, आदिनी या उपक्रमात पुढाकार घेतला.समीर सोनकांबळे,आयुष महाडीक, यशवंत जाधव, टिळकराज धुमाळ,संतोष गायकवाड,सतीश गायकवाड,आदी विद्यार्थ्यांनी सायकल,व शालेय साहित्य स्वीकारताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

सह सचिव मंगला डोळे – सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले.
खजिनदार दिलीप चक्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या वेळी परिसरातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
सामूहिक बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button