Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची इंदोर महानगरपालिका आयुक्त यांच्याशी चर्चा; स्वच्छता मॉडेलचा घेतला आढावा
ताज्या घडामोडी

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची इंदोर महानगरपालिका आयुक्त यांच्याशी चर्चा; स्वच्छता मॉडेलचा घेतला आढावा

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com11 April 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज इंदोर महानगरपालिका महापौर पुष्यमित्र भार्गव, आयुक्त शिवम वर्मा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी इंदोरच्या पर्यावरणपूरक आणि स्वच्छता विषयक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी इंदोरच्या भूमीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यभूमी म्हणत त्यांना प्रथम प्रणाम केला आणि या शहराशी असलेले आपले आत्मीय नाते व्यक्त केले.

महापौर अॅंड.भार्गव यांचे शिक्षण पुणे आणि मुंबईत येथे झालेले आहे. अॅडव्होकेट जनरल म्हणून देखील त्यांनी काम केलेले असून त्यांचा सायबर क्राइम मध्ये अभ्यास आहे. त्यांना कायद्याच्यासंदर्भात अधिक काम करायचे असल्यांबाबत देखील भार्गव यांच्यासमवेत चर्चा झाली असल्याचे डॉ.गोर्हे यांनी सांगितले. त्याचबरोबर मध्यप्रदेशात लाडक्या बहिणी संदर्भात काय-काय फरक झाला याबाबत देखील काम करण्याबद्दल चर्चा झाली. महापौर भार्गव आणि आयुक्त वर्मा यांच्या भेटीतून एमएमआर आणि महाराष्ट्र, वेगवेगळ्या महापालिकाबरोबर काय काम करता येईल याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , अजित पवार यांच्याकडे भेटीचा अहवाल देऊन पाठपुरावा डॉ.गोर्हे करणार आहेत असे त्यांनी सांगितले.

इंदौरने पर्यावरणाच्या दृष्टीने केलेल्या प्रगतीचे त्यांनी विशेष कौतुक केले. इंदौरमध्ये 6 प्रकारचा कचरा, ओला (अन्न कचरा), सुका (कागद, कापड, पुठ्ठा), पॉलिथिन/प्लास्टिक कचरा, ई-कचरा, घरगुती धोक्याचा कचरा (तुटलेला बल्ब/लाइट/काच) आणि जैव-वैद्यकीय कचरा (सॅनिटरी नॅपकिन, डायपर) हा वेगळा करण्याची पद्धत इंदौर येथील नागरिकांमध्ये रुजवली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र देखील हे केले जाते पंरतु याच्या अमलबजावणी वर भर देण्यासाठी गरज असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. भारत स्वच्छ मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून इंदोरने ज्या प्रकारे देशभरात आदर्श निर्माण केला आहे, त्यातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधी इथे येऊन अभ्यास करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
सध्या महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासोबत काम करत असल्याचा उल्लेख करत, त्यांच्या अनुभवाचा उपयोग मुंबई एमएमआर क्षेत्र, पुणे, जळगाव, नाशिक अशा शहरांमध्ये करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

इंदोर महापालिकेने केलेल्या सादरीकरणात डॉ. गोऱ्हे यांनी तीन महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले. पहिला म्हणजे, शहरातील घनकचऱ्याचे काटेकोरपणे वर्गीकरण करण्यात येत आहे, ही अतिशय स्तुत्य बाब आहे. दुसरा मुद्दा म्हणजे, इथे महापालिकेला झाडे लावण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो आणि त्या माध्यमातून हरित प्रकल्प उभारले जात आहेत. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, इंदोर महानगरपालिकेने लोकांचा सहभाग घेत यांत्रिकीकरणाच्या मदतीने संपूर्ण व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे उभे केले आहे.

हे मॉडेल केवळ इंदोरपुरते मर्यादित न ठेवता त्याचा अभ्यास करून महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये राबवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. ही कामगिरी यशस्वी करण्यासाठी सामाजिक इच्छाशक्ती आवश्यक असून, ती आपल्याकडे निश्चितपणे आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभोसरीतील गवळी माथा ते इंद्रायणी चौकापर्यंत केवळ सव्वा किलाेमीटर रस्त्यासाठी 82 कोटींची निविदेच्या कामाला तातडीने स्थगिती द्यावी – मारुती भापकर
Next Article उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे महाकालेश्वर दर्शन; भक्तिभावाने घेतला भस्मारतीचा पवित्र अनुभव
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.