ताज्या घडामोडीपिंपरी

यशवंतराव चव्हाण यांनी कोट्यावधींना रोजगार दिला – काशिनाथ नखाते

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दूरदृष्टी नेतृत्व, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ जनरेटा आणि यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली त्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली, केंद्रीय संरक्षण मंत्री उदारमतवादी नेते होते एमआयडीसी ची स्थापना करून संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून करोडो ना रोजगार दिले असे मत कामगार नेते काशिनाथ यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त असंघटित कष्टकरी कामगारांनी त्यांना अभिवादन केले.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, माधुरी जलमुलवार, किरण साडेकर,वंदना मोरे,अनिता घोगरे, विजया पाटील, वैजयंती कदम आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यामध्ये औद्योगिक क्षेत्र निर्माण व्हावे आणि त्यातून प्रगती व्हावी हा त्यांचा ध्यास होता. संपन्नता ही कष्टातून येते पण ती सर्वांसाठी असले पाहिजे या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवून त्याने महाराष्ट्राला औद्योगिक राज्य बनवले त्यांच्या कारकिर्दीत मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद येथे मोठ्या प्रमाणावर कारखाने उद्योगधंदे उभे राहिले औद्योगिक विसा विकास साधण्यासाठी त्यांनी विविध धोरणे राबवली आणि ग्रामीण अर्थव्यवस्था कणा मजबूत करण्यासाठी हातभार लावला त्यांनी साखर कारखाने सहकारी बँका गृहनिर्माण संस्था यांना चालना देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आज महाराष्ट्र सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे असे गौरवोद्गार नखाते यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button