मेघराज लोखंडे यांच्या तत्पर सेवेमुळे अर्ध्या तासात पाणीपुरवठा केला सुरु


मेघराज लोखंडे यांनी अर्ध्या तासात पाईप लाइन दुरुस्त करून पाणीपुरवठा केला चालू


नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी सांगवी ( प्रभाग ४५ ) मध्ये रस्त्याचे काम चालू असताना त्रिमूर्ती कॉलनी देवकर पथ नवी सांगवी येथील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने १ तास पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात आला होता .त्या मुळे नागरिकांनी मेघराज लोखंडे यांच्याकडे मनस्ताप व्यक्त करून संपूर्ण विषयाची माहिती त्यांना दिली.

याबाबत मेघराज लोखंडे ( चिंचवड विधान अध्यक्ष सभा ),राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांना नागरिकाकडून माहिती मिळतच त्यांनी तात्काळ म.न.पा (ह) क्षेत्रीय कार्यालय पाणी पुरवठा विभाग अधिकाऱ्यांना कॉल करून घटने बाबत माहिती देत ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना बोलून काम करून घेतले अर्ध्या तासात पुर्णपणे कामे पूर्ण करून घेतले.या वेळी रोहन चौधरी,स्वयम अशोक जाधव व चैतन्य शिंदे उपस्थित होते.










