खासदार सुनेत्रा पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला सरप्राईज भेट
सुनेत्रा पवार यांनी पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक


राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अडलेली कामे मार्गी लावण्याच्या केल्या आयुक्तांना सूचना


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला अचानक भेट दिली. त्यांनी अशा प्रकारे महापालिकेला सरप्राईज भेट दिल्याने सर्वांच्याच भुवय्या उंचवल्या. सुनेत्रा पवार यांनी पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच महापालिकेत आल्या होत्या.

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेवर याआधी भाजपची सत्ता राहिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दुजाभाव दिला जात असल्याची तक्रार त्यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे मनातील खदखद मांडली. याबाबत खासदार सुनेत्रा पवार यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली आहे. मात्र, सुनेत्रा पवार या थेट महापालिकेत अचानक आल्याने सर्वांचीच धांदल उडाली. त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या भेटीची चर्चा केली जात आहे.










