ताज्या घडामोडीपिंपरी

आळंदीत भैरवनाथ महाराज वार्षिकोत्सवात धार्मिक कार्यक्रम उत्साहात

श्री भैरवनाथ महाराज उत्सव

Spread the love

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील श्री भैरवनाथ महाराजांच्या वार्षिकोत्सवात संदल मिरवणूक धार्मिक परंपरांचे पालन करीत झाली. यावेळी शहरातील सर्व ग्रामदेवता मंदिरात श्रींची पूजा, हारतुरे आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. शनिवारी ( दि.१ )धार्मिक उपक्रमात होम हवन राजेंद्र उगले, विद्या उगले यांचे हस्ते मंगलमय उत्साहात, वेदमंत्र जयघोषात झाला. यावेळी पौरोहित्य प्रशांत जोशी आणि सहकारी यांनी केले. श्रीना अभिषेख महेश गोरे, संतोष भोसले आळंदी ग्रामस्थांचे वतीने उत्साहात करण्यात आला.
उत्सवात श्रींचा छबिना पालखी मिरवणूक, सचिन कुऱ्हाडे परिवार तर्फे देवाची काठीसह, ढोल, ताशांचे गजरात काढण्यात आली. यावेळी सवाद्य साई डिजिटल सेवा यावेळी राजू कांबळे यांनी सेवा रुजू केली. माता जोगेश्वरी व श्री भैरवनाथ महाराज विवाह सोहळा उत्साहात झाला. यावेळी श्रींची त्रिशूल सेवा सुनील घुंडरे पाटील परिवार तर्फे रुजू झाली. आळंदी पंचक्रोशीतील भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. उत्सव कमिटीचे वतीने अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे पाटील यांनी सांगितले. श्रींचे उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेने झाले. संदल मिरवणूक मोठ्या उत्साहात धार्मिक परंपरांचे पालन करीत रात्री उशिरा झाली. यात शहरातील सर्व ग्रामदेवतांची पूजा करण्यात आली.

यावर्षी बैलगाडा शर्यतीचे आयोजन न करता श्री भैरवनाथ महाराज मंदिर बांधकाम करण्यास प्राधान्य देण्याचे विषया वरून गेल्या वर्षी पासून बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात नाही. यावर्षी हि साधे पणाने धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले. आळंदी ग्रामस्थानी परिश्रम पूर्वक उत्सवात श्री भैरवनाथ मंदिरात काळ भैरवनाथ यज्ञ सोहळा, लघु रुद्र अभिषेख, अभिषेख, हारतुरे, मांडव डहाळे, गावकरी भजन, श्रींचा छबिना पालखी मिरवणूक, भरड, जागरण गोन्धळ आदी कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आल्याचे ज्ञानेश्वर घुंडरे पाटील यांनी सांगितले. यावेळी मंदिरास लक्षवेधी विद्युत रोषणाई, गाभाऱ्यात पुष्प सजावट करण्यात आली होती.

मंडप रोषणाईने मंदिर परिसराला वैभव प्राप्त झाले होते. उत्सवाची सांगत छावा चित्रपटाचे प्रदर्शन करीत होणार असल्याचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे पाटील यांनी सांगितले. मंदिरात परंपरेने धार्मिक कार्यक्रम क्षेत्रोपाध्ये श्रींचे पुजारी वाघमारे बंधू परिवार यांनी नियोजन केले. भाविकांना कमी वेळेत दर्शन व्यवस्था करण्यात आली. आळंदीकर ग्रामस्थानी श्रींचे मंदिरात दर्शन तसेच नारळ वाढविण्यास गर्दी केली होती. नवचैतन्य ढोल लेझीम पथक दापोडी येथील ढाल, ताशांचे दणदणाटात श्रींची छबिना मिरवणूक दणक्यात निघाली. यावेळी आळंदी उत्सवात आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांनी पोलीस बंदोबस्त नियोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button