ताज्या घडामोडीपिंपरी

राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात माता रमाई आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन

Spread the love

 

राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात माता रमाई आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन

आज  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने पक्ष कार्यालयात माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्ताने शहराध्यक्ष  योगेश बहल यांच्या मार्गदर्शनात महिला अध्यक्षा प्रा.कविता आल्हाट व शहर कार्याध्यक्ष फजल शेख आणि शहरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन तसेच पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महिला अध्यक्षा प्रा.कविता आल्हाट म्हणाल्या की, आज त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती आहे. माता रमाई आंबेडकर हे नाव आता एका व्यक्तीचे उरले नसून ते नाव आता समाजाची एक असीम अशी चेतना बनली आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्या पाठीशी खंबीर उभ्या राहायच्या दिन दुबळ्यांच्या वंचितांच्या सेवेत स्वतःला त्यानी वाहून घेतले होते, या जगात जे महान थोर पुरुष होऊन गेले त्या थोर पुरुषांच्या जीवनात त्यांच्या घरातील स्त्रियांचा (स्त्रीचा/धर्मपत्नी चा) सिंहाचा वाटा आहे, त्यातील एक स्त्री म्हणजे माता रमाई.

तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. गोरक्ष लोखंडे आपल्या मनोगतात म्हणाले की, माता रमाई या फार कष्टाळू मेहनती व प्रेमळ होत्या. त्या बाबासाहेबांची एका बाळा प्रमाणे काळजी घेत असे अशा महान थोर माता जिने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा भावनांचा त्याग करुन लाखो दलितांना स्वाभिमानाची शिकवण दिली त्या रमाई चा जन्म सात फेब्रुवारी १८९८ ला वनंद या गावी झाला. रमाईला एक अक्का नावाची मोठी बहीण,गौरा नावाची लहान बहीण व शंकर नावाचा लहान भाऊ होता ती चार भावंडे होते. माई किती साध्याभोळ्या कष्टाळू व काटकसरी होत्या. अशा निस्वार्थ त्याग मूर्ती रमाई चे जितके गुणगान गावे तितके कमी आहे. अशा थोर विनम्र व शालीनतेच्या मूर्तीला माता रमाई ला वंदन करतो. यावेळी अन्य पदाधिकारी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी महिला अध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, माजी नगरसेवक सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, सेवादल अध्यक्ष महेश झपके, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, असंघटीत कामगार सेल अध्यक्ष रविंद्र ओव्हाळ, महिला भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष ज्योती गोफणे, दीपक साकोरे, ज्ञानेश्ववर उर्फ माऊली मोरे, उपाध्यक्ष प्रवीण गव्हाणे, प्रदीप गायकवाड, सरचिटणीस राजू चांदणे, कुमार कांबळे, सुनंदा काटे, बाळासाहेब चौधरी, रमजान सय्यद , गुलाब जाधव, नितीन अडसूळ, संजय बनसोडे, वसंत गायकवाड, राजू शिरसाठ, बाप्पू मस्के, प्रकाश दाभाडे, विजय पोटे, धनाजी तांबे, सुनिल आडागळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button