ताज्या घडामोडीपिंपरी

एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालयाच्या वतीने ‘गोसासी राजगुरुनगर’ येथे मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – एस. एन. बी. पी. विधी महाविद्यालय मोरवाडी पिंपरी आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व खेड राजगुरूनगर तालुका विधी सेवा समिती तसेच राजगुरूनगर बार असोसिएशन खेड, पुणे आणि स्व. प्रा. नानासाहेब गोरडे सार्वजनिक ग्रंथालय, गोसासी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर शनिवार, दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी गोसासी, तालुका राजगुरुनगर खेड, जिल्हा पुणे येथे संपन्न झाले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजगुरुनगर पुणेचे ए. एस. सय्यद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गट विकास अधिकारी विशाल शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते; तसेच न्यायाधीश एस. पी. पोळ, पी. एस. इंगळे, ए. एम. हुसेन, सरिता विश्वभरण, एस. बी. नाईकनवरे (गरड), जे. व्ही. मस्के, राजगुरुनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. रोहिदास टाळकर, स्व. नानासाहेब गोरडे सार्वजनिक ग्रंथालय गोसासीचे अध्यक्ष अ‍ॅड. सतिश गोरडे, एस. एन. बी. पी. विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रोहिणी जगताप, प्रा. कैलास पोळ, एस. एन.बी. पी. विधी महाविद्यालय विधी कक्ष साहाय्यक अधिकारी स्वप्निल जाधव, सरपंच संतोष गोरडे, ग्रामसेवक अजित पलांडे, तंटामुक्त अध्यक्ष मारुती गोरडे, प्रिया तोतले, अर्पिता गोस्वामी, सुनीता तपासे, गजानन वडूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या शिबिरात महिला सक्षमीकरण आणि कायदेशीर हक्क, बालकाचे हक्क आणि बालसंरक्षण कायदे, सायबर गुन्हे आणि त्यावरील उपाय, जमिनीचे हक्क आणि जमिनीवरील वाद, अपघात आणि नुकसान भरपाईसाठी कायदेशीर प्रकिया, मोफत विधी साहाय्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घरेलू अत्याचार यावर आधारित पथनाटिका सादर केली.

कार्यक्रमाच्या संयोजनात ॲड. सोहम यादव, ॲड. आशिष गोरडे, ॲड. सुशांत गोरडे, ॲड. ऋतुराज आल्हाट, ॲड. अथर्व गोरडे, गोविंदनाना गोरडे, आप्पासाहेब गोरडे, लक्ष्मण गोरडे, बाळासाहेब गोरडे, माउली गोरडे, नवनाथ घोलप, अश्विनी गोरडे, संतोष अरुडे, उत्तम गोरडे, सुधाकर गोरडे यांनी परिश्रम घेतले. सर्व ग्रामवासीयांचा शिबिराला भरभरून प्रतिसाद मिळाला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button