प्रभाग क्रमांक २८मध्ये बहुउद्देशीय मैदान विकसित करण्याची शत्रुघ्न काटे यांची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पी के चौक ते गोविंद यशदा चौक दरम्यान असलेली एचसीएमटीआरची मोकळी जागा विकसित करा अशी मागणी शत्रुघ्न काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र.२८मध्ये असलेल्या HCMTR जागेत कोकणे चौक ते स्वराज चौक दरम्यान २ किमी लांब असे शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन तसेच विविध प्लाझा विकसित करण्यात आले आहे. याच शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन दरम्यान असलेल्या पी के चौक ते गोविंद यशदा चौक दरम्यान असलेली ४६३ मी.लांब असलेल्या क्षेत्रापैकी ९५% जागा ताब्यात असूनही अद्याप विकसित करण्यात आलेली नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत सदर जागेत आपण BMX पार्क विकसित करणार होतो परंतु या BMX पार्कचा फारसा वापर या प्रभागात होणार नसल्याचे दिसून आले.शहरात इतर दुसऱ्या ठिकाणी आपण BMX पार्क विकसित करण्याचा विचार करू शकतो.सदर जागा समतल प्रकारची असून याचा संपूर्ण उपयोग बहुउद्देशीय मैदान विकसित करण्यासाठी केल्यास नागरिकांना याचा नक्कीच फायदा होईल असे मत शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केले.
पिंपळे सौदागर परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेली नागरी लोकवस्तीचा विचार करता नागरीकांच्या सुखसुविधेच्या उपाययोजना करणे क्रमप्राप्त ठरते.अश्या परिस्थितीत या जागेचा उपयोग आपण बहुउद्देशीय टर्फचे मैदान किंवा ट्रीमिक्स पद्धतीने मैदाने विकसित करण्यासाठी करू शकतो जेणेकरून याचा लाभ परिसरातील नागरिकांना घेता येईल. यासाठी विविध सुखसुविधा असलेली बहुउद्देशीय मैदान विकसित करण्यासाठी एक चांगल्या आर्किटेक्टची नेमणूक करण्यात यावी जेणेकरून या जागेचे पूर्ण नियोजन बद्ध आराखडा तयार करून एक बहुउद्देशीय मैदान नागरिकांसाठी विकसित करता येईल.
पी के चौक ते गोविंद यशदा चौक दरम्यान असलेली HCMTR च्या मोकळ्या जागेत बहुउद्देशीय मैदान विकसित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे शत्रुघ्न काटे या निवेदनात म्हंटले आहे.









