ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी न्यायालयात ११३२ प्रकरणे लोकअदालतीत निकाली तर शासन तिजोरीत कोटींचा महसूल जमा

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी न्यायालय व पुणे जिल्हा विधी प्रधिकरण तसेच पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोकअदालीचे शनिवार, १४ डिसेंबर २०२४ रोजी पिंपरी न्यायालय नेहरूनगर येथे आयोजन करण्यात आले होते.

त्यामध्ये पिंपरी नेहरूनगर न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे एकूण २३८ खटले निकाली काढण्यात आले त्यामुळे १,७२,००,७३८/- रुपये किमतीचे दावे निकाली निघाले तर आकुर्डी PCMC न्यायालयात येथे दाखलपूर्व पाणीपट्टी व मिळकत कराची एकूण ८९४ खटले निकाली काढण्यात आले त्यामध्ये १,५४,२३,०८२/- रुपये महसूल जमा झाला व वाहतुक चलनाच्या प्रकरणात ६२,२००/- दंड जमा झाल्याने एकूण ३,२६,८६,०२०/- चा महसूल दंडस्वरूपात शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.
यामध्ये पिंपरी नेहरूनगर न्यायालयाचे न्यायाधीश मे.गजभिये, मे.एल ए.के.एमुदी, मे.बी.डी.चोखट व आकुर्डी न्यायालयात मे.वी.एस.डामरे यांनी तर पॅनल ॲडव्होकेट म्हणुन ॲड.विवेक राऊत, ॲड. अस्मिता पिंगळे, ॲड. निधी बारमेडा व ॲड. बरखा पालवे यांनी कामकाज पाहिले.

कार्यक्रमाची सुरवात पिंपरी न्यायालयातील उपस्थित न्यायाधीश व पिं.चि.ॲड.बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष
ॲड. गौरव वाळुंज यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाले. याप्रसंगी प्रमुख न्यायाधीश मे. गजभिये साहेब यांनी उपस्थित वकील व पक्षकारांना लोकअदालतीचे महत्व सांगत मार्गदर्शन केले. यावेळी राणी पुतळाबाई महिला विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापक, नागरिक व मोठ्या प्रमाणात वकिल बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रीना मगदूम, सहसचिव ॲड. राकेश जैद, खजिनदार ॲड. अक्षय फुगे, सदस्य ॲड. मानसी उदासी, ॲड. संकेत सरोदे, ॲड. विकास शर्मा, ॲड. संघर्ष सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड.उमेश खंदारे व आभार ॲड.संकेत सरोदे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button