ताज्या घडामोडीपिंपरी

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  भारतीय जनता पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना संघटित करून पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे, लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज मोरवाडी येथील भाजपा पक्ष कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्व. गोपीनाथ मुंढे यांच्या आठवणींनी उजाळा दिला.

जनतेच्या हितासाठी कार्य करणारे आणि पक्षाचे आचार विचार घरोघरी पोहचविणारे लोकनेते म्हणून लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे यांनी आपला ठसा उमटवला. आज त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना आपण त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार भाजपा पदाधिकारी यांनी केला.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, महेश कुलकर्णी, मोरेश्वर शेडगे, जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडीगेरी, शीतल शिंदे, अजय पाताडे, संजय मंगोडेकर, शैलाताई मोळक, जिल्हा उपाध्यक्ष राजू दुर्गे, प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष मनोज तोरडमल, प्रदेश युवा मोर्चा सचिव अजित कुलथे, प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष कैलास सानप, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राज तापकीर, अध्यक्ष भटके विमुक्त आघाडी गणेश ढाकणे, महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली खाडये, युवा मोर्चा सरचिटणीस दीपक नागरगोजे, युवा मोर्चा सरचिटणीस शिवम डांगे, जिल्हा चिटणीस, विजय शिनकर, देवदत्त लांडे, सतपाल गोयल, दशरथ शिंदे, कायदा आघाडी जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ झोळ, सरचिटणीस कायदा आघाडी गोरख कुंभार, उपाध्यक्ष कायदा आघाडी अमोल माने, नगरसेविका योगिता नागरगोजे, प्रज्ञा धोंडे, जयश्री वाघमारे, रेखा भोळे, गौरी सरोदे, चंदन केदार, अजय वाकोडे, अध्यक्ष दिव्यांग सेल शिवदास हांडे, कार्यकारणी सदस्य, प्रदीप सायकर, नेताजी शिंदे, भूषण जोशी, ज्ञानेश्वर नागरगोजे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button